एपिलेप्सीच्या जनजागृतीसाठी सायकलथॉन

By admin | Published: November 24, 2014 01:18 AM2014-11-24T01:18:31+5:302014-11-24T01:18:31+5:30

नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या वतीने रविवारी सकाळी ‘सायकलथॉन’चे आयोजन करून ‘अपस्मार’ या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस

Cyclistone for the Publicity of Epilepsy | एपिलेप्सीच्या जनजागृतीसाठी सायकलथॉन

एपिलेप्सीच्या जनजागृतीसाठी सायकलथॉन

Next

नागपूर : नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या वतीने रविवारी सकाळी ‘सायकलथॉन’चे आयोजन करून ‘अपस्मार’ या आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. यावेळी प्रसिद्ध न्यूरोलॉजी तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. पौर्णिमा करंदीकर, माजी महापौर माया इवनाते, नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या अध्यक्षा संध्या दुर्गे, उपाध्यक्ष डॉ. संजय रामटेके, सचिव शोभा सरोदे व नंदिनी बाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
‘राष्ट्रीय अपस्मार दिना’च्या निमित्ताने असोसिएशनच्या वतीने १७ ते २३ नोव्हेंबर या सप्ताहात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. एपिलेप्सी (मिरगी) या आजारावर विविध शाळा-कॉलेजमधून पोस्टर्स, पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशन व शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मिरगी म्हणजे काय, त्याची लक्षणे, मिरगीचा दौरा पडल्यास काय करायला हवे, काय करू नये, या आजाराशी संबंधित अंधश्रद्धा व औषधोपचार आदींवर मार्गदर्शन करण्यात आले.
आज सायकल रॅली काढून या सप्ताहाचा समारोप झाला. यावेळी ५०० वर विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथून रॅलीला सुरुवात झाली. काचीपुरा, रामदासपेठ चौक, बजाजनगर चौक, व्हीएनआयटी गेट चौक, श्रद्धानंदपेठ चौक, लक्ष्मीनगर चौक, चित्रकला महाविद्यालय चौक असे करीत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रॅलीचे समापन झाले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना टी-शर्ट, कॅप व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
जास्तीतजास्त लोकांपर्यंत या आजाराची माहिती पोहोचविण्याची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नागपूर एपिलेप्सी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांंनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Cyclistone for the Publicity of Epilepsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.