शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावाखाली सायबर गुलामगिरी : शिक्षित तरुणांवर गंडा!

By योगेश पांडे | Updated: August 11, 2025 15:42 IST

Nagpur : मोठ्या पॅकेजच्या नावाखाली अनेक तरुण सायबरच्या दलदलीत

डॉ. योगेश पांडेनागपूर : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही काळापासून प्रचंड प्रमाणात वाढले असून, अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यत आरोपी 'टार्गेट' शोधत असतात. बरेचसे रॅकेट हे विदेशातून 'ऑपरेट' होत असून, तंत्रज्ञानाचा यात मोठ्या प्रमाणावर वापर होतो. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चे युग असले तरी प्रत्यक्ष 'टार्गेट' शी संपर्क साधण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. यासाठी सायबर गुन्हेगारांच्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून उच्च शिक्षित तरुणांना 'टार्गेट' करण्यात येत आहे. चांगल्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना तीन ते चार देशांत पाठविले जाते. 

तेथे तरुण गेले की त्यांचे दस्तावेज ताब्यात घेत या टोळ्यांकडून त्यांना अक्षरशः 'सायबर गुलाम' बनविण्यात येते. त्यानंतर त्यांनाच ऑनलाइन माध्यमातून सायबर गुन्हे करायला भाग पाडले जाते. देशातील अनेक शहरांमधील तरुणांसोबत हे प्रकार घडले असून, अनेक जण तर बदनामीच्या व शिक्षा होईल या भीतीपोटी सायबर गुन्हेगारांची छळवणूक सहन करत असल्याचे दिसून येत आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सर्वसाधारणतः चीन, कंबोडिया, म्यानमार, लाओस येथून काम करतात. त्यांचे नेटवर्क अगदी स्थानिक पातळीपर्यंत असते. विविध कामांसाठी ज्याप्रमाणे एजंट असतात, त्याचप्रमाणे 'टार्गेट' सोबत संपर्क साधण्यासाठी टेक्नोसॅव्ही तरुणांचादेखील ते शोध घेत असतात. या तीन ते चार देशांमध्ये चांगल्या पगाराचे आमिष दाखवून अशा तरुणांना या टोळ्या जाळ्यात फसवितात. तरुण तेथे पोहोचले की कंपनीच्या प्रोटोकॉलचे कारण देत त्यांच्याकडून पासपोर्ट व इतर महत्त्वाचे दस्तावेज घेतले जातात.

ऑनलाइन'च करतात जाहिरातसायबर गुन्हेगारांच्या टोळ्या 'सायबर गुलाम' शोधण्यासाठी टीअर-२ व टीअर-३ शहरांमधील तरुणांवर जास्त भर देतात. या शहरांमध्ये अनेकांना हवा तसा रोजगार मिळत नाही. त्यामुळे तेथील उच्च शिक्षित व टेक्नोसॅव्ही तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. सायबर गुन्हेगार एखाद्या तथाकथित कंपनीच्या नावाखाली ऑनलाइन किंवा सोशल माध्यमांची मदत घेत जाहिरात करतात. बाहेरील देशात नोकरीची ऑफर मिळत असल्याने तरुणदेखील या जाळ्यात अलगद अडकतात. संबंधित कंपनीची योग्य शहानिशा केली नाही तर भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइम