शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सायबर कम्प्लेंट सेल सुरू

By admin | Updated: May 21, 2017 02:25 IST

सायबर गुन्हेगारीला आळा घालून पीडित नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी नागपुरात स्वतंत्र सायबर तक्रार निवारण केंद्र (सायबर कम्प्लेंट सेल) सुरू केले आहे.

पीडितांना मिळणार तातडीने दिलासा : सायबर गुन्हेगारी रोखण्याचे प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सायबर गुन्हेगारीला आळा घालून पीडित नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी नागपुरात स्वतंत्र सायबर तक्रार निवारण केंद्र (सायबर कम्प्लेंट सेल) सुरू केले आहे. या केंद्रातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे कसोशीने प्रयत्न केले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे उपस्थित होते. नोटबंदीनंतर कॅशलेस प्रक्रिया वेगवान झाली. आॅनलाईन शॉपिंग, आर्थिक व्यवहारासोबतच विविध कारणांमुळे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे सायबर गुन्हेगारीही वाढली आहे. काही आरोपी वेगवेगळे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. लॉटरी लागल्याची, एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची बतावणी करून फसवणूक केली जात आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून महिला-मुलींबाबत लज्जास्पद छायाचित्रे आणि मजकूर प्रसारित केले जात असून, त्यांना सामाजिक जीवनातून उठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकरणातील पीडित व्यक्ती तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाहीत. धाडस केले तरी आधी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा, नंतर तेथून ही तक्रार सायबर सेलकडे पाठविली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यातून पीडित व्यक्तींना अधिक मनस्ताप होतो. ही बाब लक्षात घेता पीडितांना तातडीने दिलासा मिळावा, त्यांना तक्रार करण्यासाठी इकडून तिकडे चकरा माराव्या लागू नये, म्हणून पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी सायबर कम्प्लेंट सेलची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासंबंधीच्या सूचना केल्या. त्यानुसार, प्रशासकीय इमारतीतील चौथ्या माळ्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेल्या १५ आॅगस्ट २०१६ ला अत्याधुनिक सायबर सेल सुरू करण्यात आला होता. याच ठिकाणी ‘सी-३ सायबर कम्प्लेंट सेल’ सुरू करण्यात आला. सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक निरीक्षक विशाल माने हे या सेलचे प्रमुख आहेत. तक्रारकर्त्यांना न्याय देण्यासोबतच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, एसीपी पाटील, एपीआय माने उपस्थित होते. तज्ज्ञांची मदत घेणार या संबंधाने उपस्थित प्रश्नांची उत्तरे देताना पोलीस आयुक्त म्हणाले, येथे तज्ज्ञांची संख्या कमी आहे, हे मान्य. मात्र, गुन्ह्यांचे स्वरूप पाहून बाहेरच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. किती तक्रारी आल्या अन् काय कारवाई झाली, त्याबाबतही वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी एन कॉप्समध्ये संबंधितांच्या नियमित बैठका घातल्या जाईल. या बैठकीत कामकाजाचे विश्लेषणही करण्यात येईल. तक्रारी प्रलंबित राहू नये, तातडीने निपटारा केला जावा, यावरही भर देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इकडे सायबर सेलची सुरुवात झाली असतानाच तिकडे परिमंडळ तीन मधील सायबर सेलमध्ये कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती आली. त्या संबंधाने प्रश्न उपस्थित झाला असता, वाईट प्रवृत्तीचे निष्कासन झालेच पाहिजे. पोलीस दलात वाईट आणि लाचखोर प्रवृत्तीला थारा नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी म्हटले.