शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पीएसआयला सायबर ठगाचा दे धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:11 IST

लोहमार्ग पोलीस दलात उपनिरीक्षक असलेल्या गिरीशचंद्र हरिहरनाथ तिवारी (वय ५०, रा. भोलेनगर, पारडी)यांच्या खात्यातून वर्षभरात सायबर गुन्हेगाराने दोनदा रक्कम लंपास केली. पहिल्यांदा सव्वा लाख रुपये लंपास करणाऱ्या आरोपीची तक्रार दाखल करून पोलीस चौकशी करीत होते.

ठळक मुद्देवर्षभरात दोनदा रक्कम लंपास : बँक अन् पोलीस प्रशासनातही खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोहमार्ग पोलीस दलात उपनिरीक्षक असलेल्या गिरीशचंद्र हरिहरनाथ तिवारी (वय ५०, रा. भोलेनगर, पारडी)यांच्या खात्यातून वर्षभरात सायबर गुन्हेगाराने दोनदा रक्कम लंपास केली. पहिल्यांदा सव्वा लाख रुपये लंपास करणाऱ्या आरोपीची तक्रार दाखल करून पोलीस चौकशी करीत होते. तिवारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ते बँक खाते बंद करून बँकेत दुसरे खाते उघडले. तेथे नवीन मोबाईल क्रमांक नोंदवला. तरीसुद्धा सायबर ठगाने दुसऱ्यांदा २ लाख, ९८ हजार रुपये लंपास केले. या प्रकाराने केवळ तिवारीच नव्हे तर पोलीस आणि बँक प्रशासनालाही जबर हादरा बसला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, उपनिरीक्षक तिवारी यांना २० फेब्रुवारी २०१८ ला दुपारी १ वाजता एक फोन आला. डीआरआयएम ऑफिसच्या एनटी विभागातून बोलतो, असे सांगून आरोपीने तिवारींचे आधारकार्ड, एटीएम कार्डची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून आरोपीने १ लाख २४ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळते करून घेतले. ही बाब लक्षात येताच तिवारींनी आधी बँकेत आणि नंतर पोलिसांकडे धाव घेतली. बँकेने त्यांचे खाते ब्लॉक केले तर पोलिसांनी तक्रार नोंदवून चौकशी सुरू केली.नवीन खाते, नवीन मोबाईल तरीसुद्धा २.९८ लाख लंपासतिवारी यांच्या तक्रारीची पोलिसांकडून चौकशी सुरू असताना तिवारींनी रेल्वेस्थानकाजवळच्या एसबीआयमध्ये आपले नवीन खाते उघडले. त्या खात्याला नवीन मोबाईल नंबर संलग्न केला. आता धोका नाही, असे तिवारीसह बँक अधिकाऱ्यांनाही वाटत होते. मात्र, आरोपींनी ४ जानेवारीला पुन्हा तिवारींच्या खात्यातून २ लाख, ९८ हजार रुपये काढून घेतले. तिवारी यांनी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस