शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तोंडात जाताच थेट मृत्यूच्या जबड्यात ढकलणारे 'सायनाइड' विषाची खुलेआम होतेय ऑनलाइन विक्री

By नरेश डोंगरे | Updated: March 10, 2025 14:18 IST

Nagpur : सीरियल किलर्सकडून होतो वापर : कोण घालेल निर्बंध?

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोंडात जाताच थेट मृत्यूच्या जबड्यात ढकलणारे अत्यंत जहाल असे 'सायनाइड' विविध ट्रेडिंग कंपन्यांकडून खुलेआम विकण्यात येत आहे. 'मौत का सामान' विकणाऱ्या या कंपन्यांचा हा अत्यंत घातक व्यवहार बिनबोभाट सुरू असल्याने त्यावर निर्बंध कोण घालणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सायनाइड सर्वात जहाल विष मानले जाते. त्याचा छोटासा कणसुद्धा मृत्यूला कारणीभूत ठरतो. शत्रूना संपविण्यासाठी पूर्वी सायनाइडचा वापर केला जायचा. हेरगिरी करणारे किंवा शत्रूराष्ट्रात घातपात घडविण्यासाठी शिरलेले दहशतवादी, पकडले जाताच सायनाइडचा खाऊन स्वतःला संपवितात. खतरनाक गुन्हेगारांकडून, सिरियल किलर्सकडून हत्येसाठी सायनाइड वापररत असल्याचेही वारंवार उघड झाले आहे. त्यामुळे हे अत्यंत घातक विष सहजपणे उपलब्ध होत नसावे, असा समज होता.

मात्र, तो खोटा ठरला आहे. कारण अनेक कंपन्यांकडून बिनधास्त सायनाइड विकले जात असल्याचे विविध वेबसाइटवर बघायला मिळते. 'गुगल बाबां'ना टच करताच ती माहिती मिळते. कुण्या कंपनीकडून प्रति ग्रॅम १ हजार, कुणी १२०० तर कुणी ६६० रुपयांत सायनाईड विकत आहे. सिग्मा-अल्ड्रीच पोटॅशियम सायनाइड प्रति ग्रॅम १३,२१७ रुपये प्रति ग्रॅम दरानेही विकत आहे. वेगवेगळे वितरक अन् वेगवेगळे दर, असा हा ऑनलाइन बाजार आहे.

तांत्रिकाकडून वापर : नोव्हेंबर २०२४ मध्ये छत्तीसगड-मध्य प्रदेशात नोटांचा पाऊस पाडण्याची थाप मारून एका तांत्रिकाने तीन आठवड्यांत तिघांना सायनाइड देऊन ठार मारले होते. 

'मांडवलीचा बादशाह'नागपुरातील गुन्हेगारी जगतात 'मांडवली'चा बादशाह मानला जाणारा बुकी सुभाष शाहू याची त्याच्या प्रतिस्पर्थ्यांनी प्रसादातून पोटॅशिअम सायनाइड देऊन हत्या केली होती. नागपुरातील सायनाईड किलिंगचे हे पहिले प्रकरण त्यावेळी प्रचंड गाजले होते. १९९९ ते २००७ च्या दरम्यान सायनाइड खाऊ घालून कर्नाटकात ११ महिलांची हत्या करण्यात आली होती. २००८ ला कर्नाटक पोलिसांनी के. डी. केम्पामा हिला ताब्यात घेतल्यानंतर 'सायनाइड किलिंग' प्रकरणाचे गूढ उलगडले.

 

टॅग्स :nagpurनागपूर