शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पत्नीची गळा कापून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:48 IST

प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली.

ठळक मुद्देवर्षभरातच प्रेमविवाहाचा करुण अंत : मानकापूर पोलीस ठाण्याजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली. रक्ताने माखलेला पती पोलिसांच्या हाती लागल्यावर प्रकरण उघडकीस आले. वसीम ताज मोहम्मद पठाण (२४) रा. भवानीमातानगर पारडी असे आरोपी पतीचे नाव आहे तर कोमल ऊर्फ महिमा महादेव विठोले (२०) रा. संत गजानननगर असे मृताचे नाव आहे.असीम आणि महिमा यांचे दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद होऊ लागले. कोमल वसीमला सोडून माहेरी परत आली होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. हा वाद अनेकदा मानकापूर पोलीस ठाण्यातही पोहोचला. कौटुंबिक वाद असल्याने पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. कोमलची इतरांशीही मैत्री असल्याचा असीमला संशय होता.सूत्रानुसार वसीम सोमवारी रात्री ९ वाजता महिमाच्या घराजवळ आला. त्याने महिमाला चर्चा करण्याच्या बहाण्याने संत गजानननगरच्या गल्लीत बोलावले. ही जागा मानकापूर पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ आहे. महिमा त्याला भेटण्यासाठी आली. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वसीम तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने महिमावर हल्ला केला. चाकूने तिच्या गळ्यावर व छातीवर अनेक वार केले. गळा कापून तिची हत्या केली. गल्लीत अंधार असल्याने कुणालाही कळले नाही. वसीम गल्लीत चाकू फेकून तिथून निघन गेला. महिमाची हत्या करून वसीम पायी जात होता. त्याचवेळी मानकापूर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे ज्ञानेश्वर शेंडे, राजेश वरठी, जितेंद्र पारकुंडे, अंकलुश राठोड, रवी भुजाडे आणि अजय पाटील हे ठाण्यातून बाहेर पडले. त्यांची वसीमवर नजर गेली. त्याचे हात रक्ताने माखले होते. त्याला कुणी मारहाण केली असावी, असा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवत तुला कुणी मारले असे विचारले असता, त्याने महिमाला मारल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस गेले तेव्हा महिमाचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर