शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजीकच्या बोखारा येथे पत्नीची गळा कापून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 22:26 IST

पत्नीचा आधी धारदार शस्त्राने गळा कापून तिला विषारी औषध पाजण्यात आले. त्यानंतर आरोपी पतीने स्वत: तेच विषारी औषध प्राशन केले. यात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पतीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा येथे मंगळवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देआरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोराडी ) : पत्नीचा आधी धारदार शस्त्राने गळा कापून तिला विषारी औषध पाजण्यात आले. त्यानंतर आरोपी पतीने स्वत: तेच विषारी औषध प्राशन केले. यात पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, पतीला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा येथे मंगळवारी सायंकाळी घडली.अनिता दिलीप खापेकर (४०) असे मृत पत्नीचे नाव असून, दिलीप खापेकर (४५) असे आरोपी पतीचे नाव आहे. ते शंकर मंदिर, रेल्वे गेट, पाचपावली, नागपूर येथील रहिवासी आहेत. दोघेही बोखारा येथील स्मृतीनगर परिसरातील नाल्याजवळ आले होते. तिथे दिलीपने अनिताचा शस्त्राने गळा कापून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिला विषारी औषध पाजले. ती गतप्राण होताच त्यानेही विषारी औषध प्राशन केले.दोघेही नाल्याच्या परिसरात पडून असल्याचे दिसताच नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तोपर्यंत अनिताचा मृत्यू झाला होता. शिवाय, दिलीप अत्यवस्थ होता. त्यामुळे पोलिसांनी तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर दिलीपला उपचारासाठी तातडीने नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविले. सहायक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.दिलीपने आधी पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याबाबत कुणालाही माहिती नाही. दोघेही कौटुंबिक कारणामुळे तणावात असावे. त्यातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. दिलीप अत्यवस्थ असल्याने त्याच्याकडूनही माहिती मिळू शकली नाही, असेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून