शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फ्री व पेड चॅनलबाबत ग्राहक अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:26 IST

केबल चालकांकडून तसेच ‘एमएसओ’कडून (मल्टी सर्व्हिस ऑपरेटर) अजूनही यादी न आल्यामुळे आणि फॉर्म भरून न घेतल्यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देट्रायच्या नवीन धोरणामुळे ग्राहक संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ट्राय’च्या (केंद्रीय दूरसंचार नियामक मंडळ) नवीन धोरणानुसार फ्री टू एअर १०० चॅनल आणि पेड चॅनलची ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंत निवड करायची आहे. परंतु केबल चालकांकडून तसेच ‘एमएसओ’कडून (मल्टी सर्व्हिस ऑपरेटर) अजूनही यादी न आल्यामुळे आणि फॉर्म भरून न घेतल्यामुळे ग्राहक संभ्रमात आहेत.अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटनमंत्री गजानन पांडे म्हणाले, ट्रायने १०० फ्री चॅनल विनामूल्य करावे, प्रत्येक पेड चॅनलचे दर १० पैसे ते ५ रुपयापर्यंत आणि जीएसटी १८ वरून ५ टक्क्यांवर आणावा. देशात एकूण ८८२ चॅनल असून त्यापैकी अन्य भाषेसह ५०० चॅनल फ्री टू एअर आहेत. त्यापैकी ग्राहकांना १०० फ्री चॅनल आवडीचे निवडायचे आहेत. या १०० चॅनलमध्ये २७ चॅनल दूरदर्शनचे सक्तीचे आहेत, तर ७३ चॅनलमध्ये न्यूज, धार्मिक, मनोरंजन, स्पोर्टस् व अन्य या चॅनलचा समावेश आहे. या १०० चॅनलसाठी ग्राहकांना १५३ रुपये द्यावे लागेल. याशिवाय व्यतिरिक्त पेड चॅनलमधून आवडीच्या चॅनलची निवड करायची आहे. त्यासाठी ग्राहकांना वेगवेगळ्या चॅनलसाठी १० पैसे ते १९ रुपयांपर्यंत मोजावे लागणार आहे.ग्राहकांना आवडीचे फ्री चॅनल व पेड चॅनलची निवड करण्यासाठी एमएसओ आणि केबल चालकांनी अजूनही यादी न दिल्यामुळे व फॉर्म भरून न घेतल्यामुळे तसेच बऱ्याच ठिकाणी केबलसेवा खंडित केल्यामुळे ग्राहक संभ्रमात असून ग्राहक पंचायतकडे वारंवार विचारणा करीत आहेत. सध्या एमएसओ यूसीएन, इनडिजिटल, जीटीपीएल व सिटीकेबल कार्यरत आहेत. यापूर्वी एमएसओमार्फत झी-ग्रुप, सोनी-ग्रुप, स्टार ग्रुप, कलर्स ग्रुप तसेच अन्य ग्रुपचे पॅकेजचे दर ठरलेले होते आणि पॅकेजचे मनमानी दर आकारल्या जात होते. ट्रायद्वारे पोर्टेबिलिटीची सुविधा आल्यास सेटटॉप बॉक्स बदलविण्याची आवश्यकता नाही. मोबाईलप्रमाणे केबल ऑपरेटर बदलणे सहज सोईचे होईल. केबलचालक व एमएसओने यादी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन