शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दलित समाजाला फुटीरतेचा शाप - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 15:26 IST

दलित पँथरचा सुवर्णमहोत्सव

नागपूर : वैचारिक वाद झाल्यामुळे नेत्यांना दलित पँथर टिकवता आली नाही. आज दलित समाजात प्रत्येकजण आपल्याला अखिल भारतीय नेता समजतो. त्यामुळे रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र यावे अशी भूमिका घेऊन ऐक्य होत नाही. दलित समाजाला फुटीरतेचा शाप लागलेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

सिव्हील लाइन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात दलित पँथरचा सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भुपेश थुलकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप जगताप, गौतम सोनवणे, भीमराव बन्सोड, सुधाकर तायडे, दयाल बहादुरे, बाळू घरडे, दिवाकर शेजवळ उपस्थित होते.

आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष सत्तेवर आला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. परंतु धर्मांतरामुळे त्यांना रिपब्लिकन पक्षाची स्थापना करता आली नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. दलित पँथरला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. रिपब्लिकन ऐक्यासाठी दलित पँथर बरखास्त करावी लागली. परंतु सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दलित पँथर पुन्हा उभी राहू शकते का याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भुपेश थुलकर यांनी दलित पँथर कुणाच्या नियंत्रणाखाली नव्हे तर स्वतंत्र बाण्याने उभी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी दयाल बहादुरे, दिवाकर शेजवळ, दिलीप जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात तुका कोचे, हरीश वंजारी, नगरसेविका उषा पायलट, चंद्रबोधी पाटील, संजय नगराळे आदी १३५ पँथरचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय आगलावे यांनी केले. संचालन राजन वाघमारे यांनी केले. आभार विनोद थूल यांनी मानले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर