शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  संचारबंदीने प्रदूषणाला आणले नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 23:27 IST

तुम्ही घरात आहात यामुळे केवळ कोरोना विषाणूची साखळी तुटतेय असे नाही तर या संचारबंदीचा फायदा निसर्गालाही होत आहे. आपल्या नागपूर शहराचे प्रदूषण कमालीचे घटत आहे. होय, शहराचे प्रदूषण निम्म्याने कमी झाले आहे.

ठळक मुद्देकॉर्बन डाय ऑक्साईड, धुलिकणात मोठी घट : कोट्यवधींच्या उपाययोजनांचे काम सोपे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बंद झालेले कारखाने, रस्त्यावर धावणाऱ्या एकदोन गाड्या आणि माणसांचेही फिरणे थांबले आहे. हे खरेतर चिंताजनक वातावरण आहे. मात्र यातून काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत. तुम्ही घरात आहात यामुळे केवळ कोरोना विषाणूची साखळी तुटतेय असे नाही तर या संचारबंदीचा फायदा निसर्गालाही होत आहे. आपल्या नागपूर शहराचे प्रदूषण कमालीचे घटत आहे. होय, शहराचे प्रदूषण निम्म्याने कमी झाले आहे.कोरोना विषाणूच्या उद्रेकाने संपूर्ण जगाला भीतीच्या खाईत लोटले आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाने भारतालाही विळख्यात घेतले असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने संचारबंदी व लॉकडाऊन लागू केले आहे. या संचारबंदीने लोकांना घरात बंदिस्त राहावे लागत आहे. घरी राहावे लागत असल्याने कंटाळवणे झाल्याचा विचार करीत असले तरी यातून काही सकारात्मक गोष्टीही घडून आल्या आहेत. रस्त्यावर वाहनांची संख्या कमालीची घटली आहे. अत्यावश्यक सेवा, शासकीय कर्मचाऱ्यांची वाहने सोडली तर रस्त्यावर वाहने नाहीत. मानवी संचारही कमी झाला आहे. दुसरीकडे लहानमोठे कारखाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद झाली आहेत आणि बांधकामेही बंद झाली आहेत. या सर्वांमुळे सर्व प्रकारच्या प्रदूषणात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊन १५ एप्रिलपर्यंत चालणार असल्याने कॉर्बन फूटप्रिंट कमी करण्यात मोठी मदत होईल आणि काही वर्षांचा फरक पडेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.नागपूर शहरात धुलिकण आणि वाहनांमुळे होणारे कॉर्बनचे उत्सर्जन ही सर्वात मोठी समस्या आहे. मानवी संचार, मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम आणि काही प्रमाणात नैसर्गिक गोष्टींमुळे धुलिकणांची समस्या फार मोठी आहे. शहरात धुलिकणांचा स्तर १५० ते १६० पर्यंत पोहचलेला असतो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये कमी झालेले मानवी संचार आणि थांबलेली बांधकामे यांच्यामुळे वातावरणातील धुलीकणांचे प्रमाण ५० ते ६० पर्यंत खाली आले आहे. हीच बाब वाहनांच्या प्रदूषणाबाबतही दिसून येत आहे. १६ मार्चच्या लॉकडाऊनमध्ये शहरांतर्गत रस्ते आणि महामार्गही सुनसान होते. त्यानंतरही संचारबंदी लागू करण्यात आली आणि वाहनांची संख्या घटली. त्यामुळे कार्बन आॅक्साईडचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबत सातत्याने अवलोकन करीत आहे. त्यांच्या मते कार्बन, नायट्रस वायू आणि पार्टिकुलेट मॅटरचे (धुलिकण) प्रमाण निश्चितच घटले आहे. मात्र सध्या निरीक्षण सुरू असून याबाबत निश्चित आकडेवारी काही दिवसानंतरच देता येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर विभाग प्रमुख डॉ. हेमा देशपांडे यांनी सांगितले. रस्त्यावर वाहनांची संख्या कमालीची घटली आहे, कारखाने व कंपन्यांची कामे ठप्प झाली आहेत आणि मानवी संचारही कमी झाला आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या प्रदूषणात निश्चितच घट झाली आहे. जे काही प्रमाण आहे ते नैसर्गिक गोष्टींमुळे आहे. एमपीसीबी व सीपीसीबी या परिस्थितीवर मॉनिटरिंग करीत आहे. लॉकडाऊननंतरच याबाबत अधिक माहिती देता येईल. डॉ. हेमा देशपांडे, विभाग प्रमुख, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळलॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी करण्याचा मोठा लाभ लोकांना झाला आहे. धुलिकण कमालीचे घटले आहे आणि कार्बन प्रदूषणाचा स्तरही कमी झाला आहे. सर्व गोष्टी सुरू राहिल्यानंतर जे गोष्ट करण्यास अनेक वर्ष लागले असते ते काही दिवसांच्या लॉकडाऊनमुळे शक्य झाले आहे. कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना करूनही हे यश मिळणे शक्य झाले नसते.कौस्तुभ चटर्जी, पर्यावरण तज्ज्ञ.

 

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूर