शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांमध्ये सत्तेच्या ‘मक्तेदारी’ला लगाम; संचालकांसाठी ‘दोन टर्म’ची मर्यादा;  रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 00:32 IST

अनेक सहकार धुरिण होणार सत्तेबाहेर...

नागपूर : सहकारी बँकिंग क्षेत्रातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या अधिसूचनेनुसार, आता कोणत्याही सहकारी बँकेच्या संचालकाला दोन टर्म म्हणजेच सलग १० वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहता येणार नाही. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून बँकांच्या संचालक मंडळावर कब्जा करून बसलेल्या दिग्गजांचे धाबे दणाणले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या या धडक निर्णयामुळे आगामी सहकारी बँकांच्या निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. आता प्रस्थापित संचालकांना आपली खुर्ची रिकामी करावी लागणार असून, नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल. ‘चेअरमन’ पदाची खुर्ची फिरणार -अनेक सहकारी बँकांमध्ये अध्यक्ष किंवा विशिष्ट गट गेली २०-३० वर्षे सत्तेत आहेत. नव्या नियमानुसार, ज्यांचे १० वर्षे पूर्ण झाले आहेत, त्यांना आता पायउतार व्हावे लागेल. यामुळे बँकेच्या धोरणात्मक निर्णयांवर एकाच व्यक्तीचा असणारा प्रभाव संपून ‘सत्तापालट’ अटळ आहे. प्रस्थापित संचालक स्वत: ३ वर्षांच्या विश्रांतीवर गेल्यावर आपल्या जागी पत्नी, मुलगा किंवा विश्वासू समर्थकाला उभे करू शकतात. यामुळे सत्तेची सूत्रे पडद्यामागून हलवण्याचा प्रयत्न होण्याची तज्ज्ञांना भीती आहे.बँकांच्या निवडणुका होणार ‘हाय-व्होल्टेज’देशात जवळपास १५०० सहकारी बँका असून त्यापैकी ४५० महाराष्ट्रात आणि ४५ विदर्भात आहेत. बहुतांश बँकांच्या निवडणुका वर्ष २०२७ पासून होणार आहेत. तेव्हा नागरी सहकारी आणि जिल्हा बँकांच्या निवडणुका आता अधिक चुरशीच्या होतील. दिग्गज नेत्यांना प्रत्यक्ष रिंगणाबाहेर राहावे लागणार असल्यामुळे नवीन गटांना आपली ताकद दाखवण्याची मोठी संधी मिळेल. काय आहे रिझर्व्ह बँकेचा नवा नियम?रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सहकारी बँकांच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी ‘कॅप’ लावण्यात आली आहे:- सलग १० वर्षांची मर्यादा : एखादी व्यक्ती जास्तीत जास्त सलग दोन टर्म (एकूण १० वर्षे) संचालक म्हणून काम पाहू शकेल.- तीन वर्षांचा ‘कुलिंग ऑफ’ पिरियड : १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित संचालकाला पुन्हा त्या पदावर येण्यासाठी किमान ३ वर्षांची गॅप घेणे अनिवार्य असेल.- पुर्ननिवड कधी शक्य? : तीन वर्षांच्या या गॅप दरम्यान संबंधित व्यक्तीचा बँकेशी संचालक म्हणून कोणताही प्रत्यक्ष संबंध नसावा. त्यानंतरच ती व्यक्ती पुन्हा निवडणुकीसाठी पात्र ठरेल.

बँकिंग सुधारण कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. सहकार क्षेत्राच्या निवडणुकीत त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे.- अनिल कवडे, आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण.

बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी हा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे सहकारी बँकांमध्ये लोकशाही खºया अर्थाने रुजेल आणि बँकांचा कारभार अधिक सुरक्षित होईल.- विवेक जुगादे, महामंत्री, महाराष्ट्र प्रदेश, सहकार भारती.

English
हिंदी सारांश
Web Title : RBI Caps Co-op Bank Directors' Tenure to Two Terms

Web Summary : RBI limits co-operative bank directors to two terms (10 years) to boost transparency. This move aims to break long-standing power monopolies, fostering new leadership and fairer elections in Maharashtra's banking sector.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र