शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

नेत्रदान जनजागृतीसाठी सिने कलावंतांची मदत घेणार, सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

By सुमेध वाघमार | Updated: August 26, 2023 19:43 IST

Nagpur: कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करायला हवे. परंतु गैरसमजामुळे नेत्रदान होत नाही. यामुळे जनजागृतीची मोठी गरज आहे.

- सुमेध वाघमारे नागपूर :  कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करायला हवे. परंतु गैरसमजामुळे नेत्रदान होत नाही. यामुळे जनजागृतीची मोठी गरज आहे. यासाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्यावतीने आयोजित ‘नेत्रदान पंधरवडा’चा शुभारंभ शनिवारी झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, नेत्ररोग विभागाचा प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, माजी विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. गजभिये यांनी केले. या प्रसंगी डॉ. अतुल राजकोंडावार, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. सिंगाडे, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. निलेश गादेवार, डॉ. पियूष मदान, डॉ. मुरारी सिंग आदी उपस्थित होते. संचालन डॉ. शिवानी साडंगी व डॉ. आयुषी डागा यांनी केले तर आभार डॉ. मिनु चौधरी यांनी मानले. 

‘रिजनल इन्स्टिट्यूट आॅफ आॅप्थाल्मोलॉजी’साठी प्रयत्न मेडिकलच्या नेत्ररोग विभागात येणाºया रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावे, नेत्ररोगाशी संबंधित विविध आजारावर संशोधन व्हावे यासाठी ‘रिजनल इन्स्टिट्यूट आॅफ आॅप्थाल्मोलॉजी’ गरजेचे आहे. यासाठी मेडिकलने तसा प्रस्ताव तयार करून द्यावा. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना स्वत: भेटून इन्स्टिट्यूटसाठी प्रयत्न केले जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

मानवतेच्या हितासाठी कार्य करा, सर्वांनी नेत्रदान करा‘नेत्रदान श्रेष्ठ दान’, ‘मानवतेच्या हितासाठी कार्य करा, सर्वांनी नेत्रदान करा’ असे आवाहन करणारे फलक हाती घेऊन मेडिकल व नर्सिंग कॉलेजच्या ५०० विद्यार्थ्यांनी शहरात नेत्रदान जनजागृती रॅली काढली. त्यापूर्वी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. डॉ. अशोक मदान व डॉ मिनल व्यवहारे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीमध्ये मेडिकलचे एनसीसीचे विद्यार्थी, परिचारिका, कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारnagpurनागपूर