शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला ‘कौटिल्य’ मिळवून देणार सीएसआर निधी

By मंगेश व्यवहारे | Updated: January 4, 2024 20:16 IST

मनपाचा कौटिल्य कन्सल्टन्सीसोबत सामंजस्य करार

नागपूर: नागपूर शहरात आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, शिक्षण, झोपडपट्टी विकास आदी क्षेत्रांतील विविध विकासकामे करण्यासाठी आता नागपूर महानगरपालिकेला सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीची साथ मिळणार आहे. यासंदर्भात गुरूवारी नागपूर महानगरपालिका आणि कौटिल्य कन्सल्टन्सी एलएलपी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

नागपूर महानगरपालिका आयुक्त डाॅ. अभिजीत चौधरी आणि कौटिल्य कन्सल्टन्सीचे धनंजय महाजन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. कौटिल्य कन्सल्टन्सी ही मनपाच्या विविध विभागांना आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्वसन आणि सुविधा व इतर क्षेत्रांत सीएसआर अंतर्गत निधी प्राप्त करण्यासाठी सहकार्य करणार आहे. विविध उद्योगांमधून सीएसआर निधी प्राप्त करण्यासाठी, शहर विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतील नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त प्रकल्पांची निवड करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. कौटिल्य कन्सल्टन्सीचे सदस्य धनंजय महाजन, पंकज पाटील, मनीष कुदळे, संदेश जोशी, ऋग्वेद येनापुरे, दुशांत बोंबोडे, तेजस ठाकूर यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या महात्मा गांधी नॅशनल फेलो कार्यक्रमांतर्गत विविध जिल्ह्यांतील विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली काम केले आहे.

- काय करणार कौटिल्य कन्सलटन्सीमनपाने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांना निधी मिळवून देण्याकरिता मनपा आणि कॉर्पोरेट कंपन्या यांच्यातील दुवा म्हणून कौटिल्य कन्सल्टन्सी काम करणार आहे. कंपनी सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी काम करणार आहे. तसेच मनपा हद्दीतील शाश्वत सामाजिक, आर्थिक विकास आणि समाज कल्याणासाठी संशोधन, विश्लेषण, नाविन्यपूर्ण डिझायनिंग, नियोजन आणि देखरेख कार्य प्रदान करणार आहे.

टॅग्स :nagpurनागपूर