शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाला बजाज समुहाकडून ५ कोटीचा सीएसआर निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 21:54 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शुक्रवारी बजाज उद्योग समुहाकडून प्राप्त झाला आहे. एका अनोपचारिक सोहळ्यात बजाज फायनान्सचे संचालक संजय भार्गव यांच्याहस्ते कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना धनादेश प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देप्रशासकीय भवन निर्मितीसाठी करणार १५ कोटीचे सहकार्यसंजय भार्गव यांनी कुलगुरूंना प्रदान केला धनादेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शुक्रवारी बजाज उद्योग समुहाकडून प्राप्त झाला आहे. एका अनोपचारिक सोहळ्यात बजाज फायनान्सचे संचालक संजय भार्गव यांच्याहस्ते कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना धनादेश प्रदान करण्यात आला.या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, वित्त व लेखा अधिकारी राजू हिवसे, परीक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक डॉ. नीरज खटी, प्राचार्य डॉ. नरेश खंडाईत, कार्यकारी अभियंता दत्तात्रय हरडे, उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले, अर्चना भोयर, मनिष झोडपे, बी.एस. राठोड, माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड उपस्थित होते. विद्यापीठाची सर्व प्रशासकीय कार्यालये सामावून घेणारी ४ माळ्याची भव्य इमारत वेगाने पुर्ण होत आहे. या इमारत परिसराला ‘जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर’ असे नाव देण्यात आले आहे. इमारतीच्या बांधकामावर सुमारे ३० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० टक्के निधी बजाज उद्योग समुहातर्फे सीएसआर अंतर्गत प्राप्त होणार आहे. यापूर्वी ५० लाख रुपयांचा आरंभनिधी समुहातर्फे प्राप्त झाला आहे. याप्रसंगी बजाज समुहाचे संजय भार्गव म्हणाले की, बजाज समुहाने शैक्षणिक बांधिलकी जपली आहे. आर्थक दुर्बलतेमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे परिसरात १०० शाळा सुरू करण्यात येणार आहे. प्रसंगी कुलगुरू डॉ. काणे म्हणाले की, या इमारतीत सर्व प्रशासकीय विभाग एकत्रित येणार असून, अद्यावत सुविधांनी सुसज्ज राहणार आहेत. ही इमारत अत्याधुनिक व पर्यावरणपुरक राहणार आहे. शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नव्या युगात प्रगतीची मोठी झेप घेईल, अशी अपेक्षा डॉ. काणे यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटचालीत बजाज समुहाच्या अमुल्य योगदानाबद्दल कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी भार्गव यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्याम धोंड यांनी केले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर