दारूची तस्करी करणारे पाच आराेपी अटकेत
नागपूर : पाेलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्या एका वृद्धासह पाच आराेपींना अटक करून एक लाखाचा माल जप्त केला. झाेन ५ चे डिसीपी निलाेत्पल यांच्या विशेष पथकाने काेराडी येथे दुचाकीस्वार माे.फिराेज जहीर अंसारी (२७, रा.लेंडेनग) व माेटू रमे करंडे (२५, रा.कवठा) यांच्यासह रिक्षा चालक परमजीत सिंह गुरुचरण सिंह मड्डार (३६, रा.कवठा) यांना पकडून त्यांच्याकडून ६३ हजारांचा माल जप्त केला. याप्रमाणे जुनी कामठी परिसरात दुचाकीस्वार शालिक संताेष माेहतकर (४७, रा. अजनी) यास २,५०० रुपयांची दारू घेऊन जाताना पकडले. त्याने जयस्तंभ चाैकस्थित चकाेले वाइन शाॅपचा मॅनेजर विवेक बनवारी यादव (३६, रा.यादवनगर) याने दारू विकली हाेती. यासह मानकापूर पाेलिसांनी हेमंत रामचंद्र काेलते (६६, रा.गाेधनी रेल्वे स्टेशन) ला अटक करून ७ हजारांची दारू जप्त केली.