शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 22:57 IST

शहराच्या विविध भागात भाजीबाजाराला परवानगी देण्यात आली आहे. परंतु सामाजिक अंतर ठेवूनच मालाची खरेदी व विक्री करण्याला अनुमती आहे. असे असूनही दक्षिण नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी होत आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा धोका : प्रशासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. कामकाज व व्यवसाय ठप्प आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला यातून वगळण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात भाजीबाजाराला परवानगी देण्यात आली आहे. परंतु सामाजिक अंतर ठेवूनच मालाची खरेदी व विक्री करण्याला अनुमती आहे. असे असूनही दक्षिण नागपुरातील पिपळा रोडवरील भाजीबाजारात गर्दी होत आहे. शनिवारी सकाळी या बाजारात खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. यातून संसर्ग होण्याचा धोका आहे. पिपळा रोड परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिसरातील नागरिकांची सुविधा व्हावी यासाठी पिपळा बाजार भरण्याला परवानगी देण्यात आली. दररोज भरणाऱ्या या बाजारात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. भाजीपाल्याच्या वाहनांचीही वर्दळ वाढली आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. गर्दीमुळे कॉटन मार्केट येथील भाजीबाजार बंद करण्यात आला. रेशीमबाग येथील बाजारही बंद करण्यात आला. पिपळा रोडवरील बाजारात सोशल डिस्टन्स न पाळल्यास हा बाजार बंद करावा लागेल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजारnagpurनागपूर