शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नागपुरात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठात झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:51 IST

दिवाळीच्या पूर्वसंध्येला विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्गाची खरेदी जोरात आहे. आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर दिसून आला. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशीही सराफांकडे ग्राहकांची गर्दी होती. शहरातील विविध भागांतील मॉलमध्ये ग्राहकांची संख्या तुलनेत वाढली आहे. 

ठळक मुद्देपूर्वसंध्येला घरगुती वस्तूंची खरेदी : चायनीज दिव्यांच्या माळांना मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. वेतन आणि बोनसची रक्कम हाती आल्याने नोकरदार वर्गाची खरेदी जोरात आहे. आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आदींबरोबरच कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर दिसून आला. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशीही सराफांकडे ग्राहकांची गर्दी होती. शहरातील विविध भागांतील मॉलमध्ये ग्राहकांची संख्या तुलनेत वाढली आहे. 

कापड व्यावसायिक अजय मदान म्हणाले, गेल्या काही दिवसांपेक्षा रविवारी ग्राहकांची गर्दी वाढली होती. लहान मुले आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी केली. बुधवारी कपड्यांच्या खरेदीवर पुन्हा भर राहील. मध्यवर्ती भागात आलेल्या ग्राहकांना वाहन पार्किंगचा प्रश्न भेडसावत होता. काहींनी लगतच्या रस्त्यावर, मोकळ्या जागेत वाहने उभी करून खरेदीला जाणे पसंत केले. नोकरीधंद्यानिमित्त व्यग्र असणाऱ्या काहीच नागरिकांनी आॅनलाईन शॉपिंगला पसंती दिली.दिव्यांच्या माळांना मागणी 
गांधीबाग आणि सीताबर्डी येथील बाजारपेठेत घरसजावटीच्या दिव्यांच्या माळांना प्रचंड मागणी आहे. गांधीबाग भागातील इलेक्ट्रिक दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. विशेषत: चीनच्या माळांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिव्याच्या संख्येनुसार माळांची किंमत आहे. ५० रुपये ते २ हजार रुपयांपर्यंत माळा असल्याचे विक्रेते म्हणाले.किरकोळ दुकाने आणि मॉलमध्ये गर्दी 
एम्प्रेस मॉल आणि शहरातील मोठ्या मॉलसह घाऊक व किरकोळ दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. महाल, गांधीबाग, इतवारी, सीताबर्डी, सदर, खामला, सक्करदरा, जरीपटका, हिंगणा या परिसरांतील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी असून मॉल, बिग बाजार, डी-मार्ट गर्दीने फुलले आहेत. दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या साईटवर आॅफर सुरू आहेत. आॅनलाईन वस्तू तुलनेने माफक किमतीत उपलब्ध असतानाही यंदा विक्रीत घसरण झाल्याची माहिती आहे.यंदा आॅनलाईन खरेदी कमीच  
भारतीय ग्राहक कोणत्याही मोठ्या वस्तूंची खरेदी हाताळून आणि निरखून पाहिल्याशिवाय करीत नाहीत. गेल्यावर्षीपर्यंत जोमात असलेली आॅनलाईन बाजारपेठेत यंदा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, मोबाईल आदी वस्तू कुटुंबासह खरेदीची परंपरा आहे. त्यामुळे आॅनलाईन खरेदी करताना ग्राहक विचार करतो. अखेर दुकानात जाऊन आवडीची वस्तू खरेदी करतो. याशिवाय दागिन्यांची आॅनलाईन खरेदीला अपवाद आहे. ग्राहक आजही पारंपारिक सराफांकडूनच दागिने खरेदी करीत आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या आॅनलाईन दागिने विक्रीला ग्राहकांची पाठ फिरविल्याचे सोना-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले. 
नव्या फटाक्यांची बाजारात रेलचेल
फराळ, रांगोळी, आकाशकंदिलाबरोबरच फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळीचा उत्साह साजराच होऊ शकत नाही. ध्वनिप्रदूषणाबाबतची जागरुकता वाढत असल्याने रोषणाईच्या फटाक्यांचे अनेकविध प्रकार यंदा बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षी भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढल्यानंतरही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. विविध वयोगटांनुसार फटाक्यांचे प्रकार यंदा बाजारपेठेत दाखल झाले आहेत. ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे अनेक प्रयत्न होत असताना कमी आवाजाचे फटाके मोठ्या संख्येने दुकानांमध्ये दाखल झाले आहेत. पारंपरिक फटाक्यांसह हवेतील एरियल प्रकारांना यंदा चांगली मागणी आहे. सोबत मिनी फाऊंटन, डिस्को फ्लॅश, रेल्वे सिग्नल हे नवे प्रकार बाजारात आहेत. रंगसंगती आणि कमी आवाज यांच्यात वैविध्य आणले आहे. गोल्ड रश, रोषणाईसह सुगंध देणारे कलर स्मोक या प्रकारांना मोठी मागणी आहे. कारगील बुलेट, मल्टिकलर कॅन्डल या प्रकारांचीही रेलचेल आहे. सुतळी बॉम्ब, माळ, मोठी लडी अशा आवाजाच्या फटाक्यांकडे ग्राहकांनीच पाठ फिरविली आहे. त्यातही कंपन्यांनी रोषणाईच्या फटक्यांचे अनेक प्रकार आणल्याने त्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. ‘गोल्ड व्हिसल’ या प्रकारात फटाका पेटविल्यानंतर शिट्टीचा आवाज अनुभवता येणार आहे. ‘डिस्को फ्लॅश’मध्ये फटक्यांसह रोषणाईचा आनंद घेता येणार आहे. 

 

टॅग्स :DiwaliदिवाळीMarketबाजार