शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मेयोच्या डॉक्टरांवर जमावाची चाल : मृतांचे नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:01 IST

उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देडॉक्टरांना हवे पोलिसांचे संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी येथील डॉक्टरांनी केली आहे. कोरोनाची लक्षणे असताना तपासणी न करताच घरी राहून स्वत:हून औषधी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, आजार वाढल्यानंतर रुग्ण रुग्णालयात येत असल्याने वाढून अचानक मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने नातेवाईक आपला संताप डॉक्टरांवर काढत आहेत. लक्षणे नसताना रुग्ण पॉझिटिव्ह आलाच कसा, चालता-बोलता असताना मृत्यू झालाच कसा आदी प्रश्नांना उत्तरे देत मेयोतील डॉक्टर त्रासून गेले आहेत. तरीही त्यांच्याकडून समजविण्याचा प्रयत्न होतो. परंतु रुग्णाचे एकापेक्षा जास्त नातेवाईक प्रश्न विचारीत असल्याने प्रत्येकाला उत्तरे देणे डॉक्टरांना कठीण जात आहे. यातूनच वाद निर्माण होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी असेच झाले, गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या बजेरिया येथील ४९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. याचदरम्यान आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच नातेवाईकांनी आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून कोविड हॉस्पिटलसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात के ली. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने प्रवेशद्वारासह परिसरात जाण्याचा मार्ग रोखून धरला.नातेवाईकांच्या मते, कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना भेटणे अशक्य असते. त्यांच्या प्रकृ तीची चौकशी कु ठे करावी, हा प्रश्न असतो आणि अचानक रुग्ण गंभीर झाल्याची किंवा मृत्यूची माहिती दिली जाते. यामुळे संतापाचा भडका उडतो. तर, डॉक्टरांनुसार कोविड हॉस्पिटलमध्ये ३०० वर रुग्ण भरती आहेत. रुग्णाचा एकच नातेवाईक नाही तर चार-पाच कधी त्यापेक्षा जास्त नातेवाईक वारंवार रुग्णाच्या प्रकृ तीची विचारपूस करतात, आधीच डॉक्टरांची संख्या कमी, त्यात प्रत्येकवेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण जाते. यातच वारंवार रुग्णालयावर लोकांचा जमाव येत असल्याने डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तही राहत नाही. यामुळे एखाद्यावेळी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू