शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

नागपुरात आमदारकीसाठी नगरसेवकांतून इच्छुकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:35 IST

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

ठळक मुद्देभाजपासोबतच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपातून अनेक दावेदार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बसपा नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीची तयारी दर्शविली आहे. पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अनेक नगरसेवकांनी उमेदवारीसाठी दावा केला असून, निवडणुकीची तयारी सुरू केल्याने काही मतदार संघातील विद्यमान आमदारांची धाकधूक वाढली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपद भूषविले आहे. वन राज्यमंत्री परिणय फुके, आमदार प्रा. अनिल सोले, कृष्णा खोपडे, नाना श्यामकुळे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने व राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये नगरसेवक होते. माजी आमदार मोहन मते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. अलीकडच्या काळात नगसेवकांतून अनेक जण आमदार, मंत्री झाल्याने विद्यमान नगसेवकांतील अनेकांची आमदार होण्याची इच्छा आहे.पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर, चेतना टांक, काँग्रेसकडून महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, पुरुषोत्तम हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे आदी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. काहींनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे, तर काहींनी इच्छा असूनही आमदारांची नाराजी नको म्हणून उमेदवारीसाठी दावा करण्याचे टाळले आहे.दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्यासाठी भाजपाचे नगरसेवक सतीश होले, डॉ. रवींद्र भोयर, दीपक चौधरी इच्छुक आहेत. या सर्वांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे संजय महाकाळकर तयारीला लागले आहेत. भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आल्यास, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहेत.पश्चिम नागपुरात यावेळी भाजपातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. महापौर नंदा जिचकार, नगरसेवक दयाशंकर तिवारी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांचीही निवडणूक लढण्याची इच्छा आहे.मध्य नागपूर विधानसभा मतदार संघातून भाजपा शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नगरसेवक प्रवीण भिसीकर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर, अपक्ष नगरसेवक आभा पांडे यांनीही निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून नगरसेवक अ‍ॅड. धरमपाल मेश्राम, संदीप जाधव निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे यांनी दावा केला आहे. बसपाचे जितेंद्र घोडेस्वार यांचीही निवडणूक लढण्याची इच्छा आहे.दक्षिण-पश्चिममध्ये सत्तापक्षात इच्छुक नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदार संघ असलेल्या दक्षिण-पश्चिम मतदार संघातून भाजपाकडून कुणीही उमेदवारीसाठी दावा केलेला नाही. मात्र काँग्रेसकडून नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, रेखा बाराहाते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. प्रफुल्ल गुडधे हे यापूर्वीही निवडणूक लढले आहेत.नगरसेवकांतून घडले प्रभावी व्यक्तिमत्त्वगतकाळात महापालिका नगरसेवकांतून माजी महापौर बॅरिस्टर शेषराव वानखडे, तेजसिंगराव भोसले, भाऊ साहेब सुर्वे, भाऊ मुळक, कृष्णराव पांडव असे प्रभावी राजकीय व्यक्तिमत्त्व घडले. या सर्वांची आमदार व मंत्रिपदाची कारकीर्द प्रभावी ठरली. शहर विकासात या सर्वांचा मोठा वाटा आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकMLAआमदार