शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘क्रॉसबो माईल्स’; एक पाऊल महिला सबलीकरणासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 10:03 IST

महिलांमध्ये सुरक्षेची भावना रुजविणे, सशक्तीकरण करणे, पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळवून देण्याच्या हेतूने देशव्यापी पातळीवर परिवर्तनाची मोहीम राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देसृष्टी बक्षी यांची ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ३८०० किमी पदयात्रा

आॅनलाईन लोकमतनागपूर : महिलांमध्ये सुरक्षेची भावना रुजविणे, सशक्तीकरण करणे, पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळवून देण्याच्या हेतूने देशव्यापी पातळीवर परिवर्तनाची मोहीम राबविण्यात येत आहे. ‘क्रॉसबो माईल्स’ नावाने सुरू असलेल्या या मोहिमेत डिजिटल आणि आर्थिक साक्षरता ही उद्दिष्टे साकारण्याचा प्रयत्न असेल.‘ ‘कॅम्पेन फॉर चेंज’ अर्थात बदल घडविण्यासाठी मोहिमेच्या मुख्य सूत्रधार आहेत सृष्टी बक्षी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला सबलीकरण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय महिला आयोगाच्या पाठिंब्याने सृष्टी हा प्रकल्प राबवित आहेत.

कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा...सृष्टी बक्षी या कन्याकुमारी ते काश्मीर अशी ३८०० किमी पदयात्रा करीत असून १५ सप्टेंबर रोजी त्यांनी मोहिमेला सुरुवात केली. २६० दिवसांत १२ राज्यांतील २० प्रमुख शहरे तसेच अनेक खेड्यांना भेटी दिल्यानंतर त्या एप्रिल महिन्यात काश्मीरला पोहोचतील. आतापर्यंत एक हजार किमी अंतर पूर्ण करीत नागपूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. २३ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात त्या नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला कार्यशाळा आणि चर्चासत्रे घेणार आहेत. याशिवाय काही खेड्यांना भेटी देत तेथील महिलांमध्ये जागरुकता निर्माण करतील.आतापर्यंत मार्गातील अनेक गावात त्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी लोकांचे मतपरिवर्तन केले. त्यांच्या परिश्रमाला साद घालून अनेक जण मोहिमेशी जुळले आहेत. विविध शहरात काही सामाजिक संस्था, युवा आणि व्यावसायिक ग्रूपच्या सहकार्याने कार्यशाळा आणि चर्चासत्रांचेही आयोजन करीत आहेत. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि बरोबरीच्या अधिकारासाठी, महिला सुरक्षित व्हाव्यात यासाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून त्या पाठिंबा मागत आहेत. अनेक गावांमधील महिलांचा संघर्ष आणि त्यांच्यात जागविलेला आत्मविश्वास वृत्तपटाच्या माध्यमातून संग्रहित देखील करीत आहेत.‘क्रॉस बो’ला पाठिंबा देण्यासाठी हे करा...‘क्रॉस बो’ अ‍ॅप ‘अ‍ॅपल स्टोअर’ आणि ‘प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहे. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाला स्वत:चा पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन सृष्टी यांनी केले आहे.‘क्रॉस बो’पदयात्रा आज नागपूर जिल्ह्यातशनिवार(२३ डिसेंबर): जाम परिसरात ४१ किमी पदयात्रा, रविवार: चिमनाझरी थेये ३७ किमी पदयात्रा मंगळवार: मानापूर गवसी येथे पदयात्रा व मातृसेवा संघ येथे चर्चासत्र, बुधवार:कामठी रोड आणि हिस्लॉप कॉलेज येथे कार्यशाळा, गुरुवार: सायंकाळी कोराडी नाका परिसरात ‘नाईट वॉक’. शुक्रवार आणि शनिवार: सावनेर परिसरात ३७ किमी पदयात्रा आणि कार्यशाळा.

टॅग्स :Womenमहिला