शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

रेल्वेरूळ ओलांडणे जीवावर बेतले

By admin | Updated: September 7, 2016 03:00 IST

रेल्वेस्थानकावर जीव धोक्यात टाकून रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारे काही मजूर दोन्ही लाईनवरून अचानक गाड्या आल्याने मध्येच अडकले.

शेतमजुराचा मृत्यू : दोन महिला जखमी, रेवराळ स्थानकावरील घटनाकोदामेंढी : रेल्वेस्थानकावर जीव धोक्यात टाकून रेल्वेरूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणारे काही मजूर दोन्ही लाईनवरून अचानक गाड्या आल्याने मध्येच अडकले. त्यात भीतीपोटी एक मजूर रेल्वेखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दोन महिला मजूर गंभीर जखमी झाल्या. अन्य नऊ महिला मजूर थोडक्यात बचावल्या. ही घटना मौदा तालुक्यात रेवराळ रेल्वेस्थानकावर मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मनोहर टीकाराम गजभिये (४२, रा. नीलज - गोंडउमरी, ता. साकोली, जिल्हा भंडारा) असे मृत मजुराचे नाव असून, प्रिया आनंद मेश्राम (३५, रा. नीलज - गोंडउमरी, ता. साकोली, जिल्हा भंडारा) व चंद्रप्रभा मधुकर राऊत (६५, रा. नीलज - गोंडउमरी, ता. साकोली, जिल्हा भंडारा) अशी जखमी महिला मजुरांची नावे आहेत. या तिघांसह जयपाल मेश्राम, जयश्री मेश्राम, मायावती वते, दालंदर रामटेके, मनीषा उके, खुशाल, रामटेके, हेमलता मेश्राम, मदन उके, सुनीता गजभिये असे एकूण १२ मजूर मंगळवारी दुपारी ३ वाजता गोंदिया रेल्वेस्थानकाहून गोंदिया - इतवारी (नागपूर) मेमो रेल्वेने मौदा तालुक्यातील रेवराळ येथे येण्यास निघाले होते. ते सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास रेवराळ रेल्वेस्थानकावर उतरले. त्यांनी काही वेळ रेल्वेस्थानकावर विश्रांती घेतली आणि सर्व साहित्य घेऊन रेवराळपासून दोन कि.मी अंतरावर असलेल्या चारबा येथे जाण्यास निघाले. सर्व मजूर रेल्वेरूळ ओलांडत चौथ्या लाईनवर आले. या लाईनवर मालगाडी उभी होती. त्यातच दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनवर अचानक गाड्या आल्या. त्यामुळे सर्व मजूर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाईनच्या मध्ये अडकले. मनोहर गजभिये हा पुढे होता. अगदी जवळून रेल्वे वेगात जात असल्याने गाड्यांचा आवाज, हवा तसेच मागे मालगाडी उभी असल्याने त्यांना हालचाल करण्यासाठी वाव नसल्याने ते चांगलेच घाबरले. घाबरलेल्या अवस्थेत मनोहर गजभिये हा चुकून रेल्वेत अडकला आणि क्षणार्धात त्याच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. शिवाय, प्रिया मेश्राम व चंद्रप्रभा राऊत या दोन महिलांना दुखापत झाली. गाड्या निघून गेल्यानंतर रेल्वेस्थानक व परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. नागरिकांनी महिलांना बाहेर काढले. जखमींवर प्रथमोचार करून भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ रवाना केले. (वार्ताहर)शेतीच्या कामासाठी आले होतेसध्या मौदा तालुक्यात धानाच्या निंदणाचे काम सुरू आहे. तालुक्यात मजुरांची कमतरता असल्याने भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मजूर दरवर्षी निंदणाच्या हंगामात मौदा तालुक्यात येतात. त्यामुळे सदर मजूर हे मौदा तालुक्यातील चारबा येथील नारायण गढे यांच्याकडे आले होते. या सर्वांचा नारायण गढे यांच्याकडेच ८ ते १० दिवस मुक्काम होता. मृत मनोहर गजभिये हा या मजुरांचा ठेकेदार असल्याची माहिती काही मजुरांनी दिली. मजूर मुक्कामी येत असल्याने त्यांच्याजवळ कपड्यांपासून तर खाण्याच्या साहित्याच्या पिशव्या व गाठोडे होते. या अपघातामुळे मजूरवर्गात दहशत निर्माण झाली आहे.