शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

नागपुरात शाळा, कॉलेज पोशाखाच्या विक्रीतून कोट्यवधींची करचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:01 AM

रेडिमेड गारमेंट दुकानदार शाळा आणि कॉलेजसोबत करार करून शैक्षणिक सत्रात लाखो पोशाखांची विक्री करतात. नागपुरात आठ दिवसात जवळपास ५० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल करतात, पण जीएसटी भरण्याकडे दुकानदार कानाडोळा करतात. पालकांकडून वसूल केलेल्या जीएसटीवर शाळा आणि दुकानदार संगनमताने डल्ला मारत असल्याची बाब बाजारपेठेची पाहणी करताना दिसून आली.

ठळक मुद्दे८ दिवसांत ५० कोटींचा व्यवसाय : दुकानदारांचा शाळांसोबत करार, आज जीएसटी दिन

 लोकमत न्यूज नेटवर्क  मोरेश्वर मानापुरेनागपूर : रेडिमेड गारमेंट दुकानदार शाळा आणि कॉलेजसोबत करार करून शैक्षणिक सत्रात लाखो पोशाखांची विक्री करतात. नागपुरात आठ दिवसात जवळपास ५० कोटींपेक्षा जास्तची उलाढाल करतात, पण जीएसटी भरण्याकडे दुकानदार कानाडोळा करतात. पालकांकडून वसूल केलेल्या जीएसटीवर शाळा आणि दुकानदार संगनमताने डल्ला मारत असल्याची बाब बाजारपेठेची पाहणी करताना दिसून आली.या संदर्भात इतवारी आणि धरमपेठ येथील पोशाखांची विक्री करणाऱ्या दुकानदारांशी चर्चा केली असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ग्राहक बिल मागत नाहीत आणि आम्हीही देत नाही, असे नाव न सांगण्याच्या अटीवर दुकानदाराने सांगितले. रेडिमेड गारमेंटवर पाच टक्के जीएसटी आहे, हे विशेष.आयकर व राज्यकर विभागाची संयुक्त कारवाई व्हावीराज्यकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सीबीएससी शाळा आणि दुकानदारांमध्ये पोशाख विक्रीचा अलिखित करार आहे. त्यानुसार शाळांचे व्यवस्थापन पालकांना संबंधित दुकानातून पोशाख घेण्यास सांगतात. पूर्वी शाळा पोशाखांची विक्री शाळेतच करायची, पण विभागाच्या कारवाईनंतर ती बंद झाली. आठ दिवसाचा हा व्यवसाय कोट्यवधीं रुपयांचा आहे. काही नामांकित दुकानदार दरवर्षी कोटींचा व्यवसाय करतात. बल्कमध्ये कपडे विकत घेऊन टेलरकडून शिवून घेतात. या व्यवसायात नफाही जास्त आहे. एवढेच नव्हे तर तेवढ्याच प्रमाणात कर चुकवेगिरीही जास्त आहे. याकरिता आयकर आणि राज्यकर विभागाच्या संयुक्त कारवाईची गरज आहे. त्यातून कोट्यवधींच्या करचोरीचे घबाड बाहेर येईल.चार वर्षांपूर्वी वसूल केला होता विक्रीकरपूर्वीच्या विक्रीकर विभागाने चार वर्षांपूर्वी शाळांसोबत करार असलेल्या दुकानदारांवर कारवाई करून उलाढालीच्या आधारावर विक्रीकर वसूल केला होता. त्यानंतर दुकानदारांवर कारवाई न झाल्यामुळे त्यांचे फावत आहे. पोशाख तयार करून विक्री करणाऱ्या दुकानदारांना कराच्या टप्प्यात आणण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. १ जुलैला जीएसटीच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण वर्ष यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि ग्राहक व व्यापाऱ्यांना जीएसटीची माहिती देण्यात गेले. त्यानंतरही दुकानदार जीएसटीची चुकवेगिरी करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कारवाईची मोहीम आयुक्तांच्या आदेशानंतर १ जुलैनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात कर चुकवेगिरी करणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही, अशा इशारा राज्यकर अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर दिला.

टॅग्स :fraudधोकेबाजीTaxकर