शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

जमीन भोगवटा परिवर्तनात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:37 IST

चिखलदरा तालुक्यातील सुमारे १००० एकर जमिनीच्या भोगवटा वर्गात २ वरून १ असा बदल करण्यात आला असून, त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : राज्य शासनाला उत्तर सादर करण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : चिखलदरा तालुक्यातील सुमारे १००० एकर जमिनीच्या भोगवटा वर्गात २ वरून १ असा बदल करण्यात आला असून, त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर खडके यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्याच्या महसूल विभागाचे सचिव, वन विभागाचे सचिव, अमरावती विभागीय आयुक्त, अमरावती जिल्हाधिकारी व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर आता १४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल.याचिकेतील माहितीनुसार, संबंधित जमीन चिखलदरा तालुक्यातील अल्लाडोह, लावदा, शहापूर, मोठा, मडकी व मसुंदी येथील नागरिकांची आहे. शासनाने या गावांतील नागरिकांच्या पूर्वजांना १९७० ते १९७७ या काळात वनजमीन शेतीसाठी लीजवर दिली होती. जमीन देताना विविध अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यानुसार लाभार्थींना ही जमीन शासनाची परवानगी घेतल्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीला विकता येत नाही, तसेच वन विभागाला आवश्यकता वाटल्यास ही जमीन विविध उद्देशांसाठी संपादित करता येते. ही जमीन भोगवटा वर्ग-२ गटात मोडते.या क्षेत्रातील सर्व नागरिक गरीब असून, त्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन अनेक बिल्डर्स अल्प दरात ही जमीन खरेदी करीत आहेत. हा व्यवहार शासनाच्या परवानगीशिवाय होत आहे. वन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत मिळून हा गैरव्यवहार केला जात आहे. जमीन खरेदी केल्यानंतर तिला अवैधरीत्या भोगवटा वर्ग-१ मध्ये परिवर्तित केले जात आहे. भोगवटा वर्ग-१ मध्ये परिवर्तित जमिनीवर फार्महाऊस बांधून ते अन्य ग्राहकांना विकले जात आहेत. आतापर्यंत सुमारे १००० एकर जमीन भोगवटा वर्ग-२ मधून वर्ग-१ गटात परिवर्तित करण्यात आली आहे. अमरावती विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून, २० फेब्रुवारी २०१४ रोजी अहवाल सादर केला होता. त्यामध्ये जमीन खरेदीदार हे वन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत मिळून हा गैरव्यवहार करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता; परंतु त्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.सखोल चौकशीची विनंतीया प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशीमध्ये दोषी आढळणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. जी. जी. बडे यांनी बाजू मांडली.अधिवेशनात पडसादनागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात या विषयाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रथमदर्शनी हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले आहे. न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे शासनाला भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर