शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

बाईक मार्केटिंगद्वारे महाठगबाजाने कोट्यवधी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 10:15 IST

नेटवर्किंग मार्केटिंगच्या नावाखाली आभासी जग निर्माण करणाऱ्या एका महाठगबाजाने देशातील लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये हडपले आहेत.

ठळक मुद्देनागपूर-विदर्भासह सर्वदूर नेटवर्क दिल्लीच्या महाठगाचे मायाजाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेटवर्किंग मार्केटिंगच्या नावाखाली आभासी जग निर्माण करणाऱ्या एका महाठगबाजाने देशातील लाखो लोकांचे कोट्यवधी रुपये हडपले आहेत. संजय भाटी असे या महाठगाचे नाव असून, त्याने व त्याच्या टोळीतील ठगबाजांनी देशभरातील विविध प्रांताप्रमाणेच नागपूर-विदर्भातीलही हजारो लोकांना गंडविल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.महाठग भाटी आणि त्याच्या साथीदारांनी काही वर्षांपूर्वी दिल्लीत मे. गर्वित इनोवेटिव्ह प्रमोटर कंपनी सुरू केली. एकदा या कंपनीत ६२, १०० रुपये जमा करून त्याच्याकडे दुचाकी बूक करायची. ही दुचाकी तो ग्राहकाला देणार नाही. ती दुचाकी तो खाद्य पदार्थ पुरविणाऱ्या किंवा विविध प्रकारच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना भाड्याने देईल. त्या बदल्यात या दुचाकीचे सर्व मेंटेनन्स आणि विमा वगैरे करून ज्याने भाटी अ‍ॅन्ड कंपनीकडे जमा केले, त्या सदस्याला त्याच्या दुचाकीचे भाडे म्हणून दर महिन्याला ९७६५, रुपये परतावा मिळेल, अशी ही योजना होती. अवघ्या साडेसात महिन्यात आपली रक्कम वसूल आणि नंतर आयुष्यभर ९७६५ रुपये महिन्याला मिळकत होणार असल्याचे पाहून दिल्ली, नोएडाच नव्हे तर देशातील विविध प्रांतातील हजारो भोळेभाबडे नागरिक भाटी अ‍ॅन्ड कंपनीच्या जाळ्यात अडकू लागले. भाटीच्या बनवाबनवीचे नेटवर्क महाराष्ट्रातही पोहचले अन् नागपूर विदर्भातून हजारो जणांनी महाठग भाटीच्या मे. गर्वित इनोवेटिव्ह प्रमोटर कंपनीत ६२,१०० रुपये जमा करून कागदोपत्री दुचाकी विकत घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. सुरुवातीला ६८ हजार रुपये गुंतविणाऱ्यांना महिन्याला ९ हजार रुपये मिळू लागल्याने महाठग भाटीच्या ‘चिटींग कंपनीची सर्वत्र जोरदार माऊथ पब्लिसिटी झाली. त्यामुळे भाटी अ‍ॅन्ड कंपनीने ६८ हजार गुंतवणाऱ्याला कागदोपत्री (प्रत्यक्ष नाही!) दुचाकी देण्यासोबत आणखी सदस्य जोडा आणि नंतर कंपनीच्या दुचाक्यांची डीलरशिप मिळवून महिन्याला घरबसल्या लाखो रुपये कमवा, अशी ऑफर दिली.त्यानुसार, एक सदस्य दुसऱ्याला आणि दुसरा तिसऱ्याला या नेटवर्कशी जोडू लागला. आम्ही लाखो रुपये कमवित आहोत, तुम्हीही कमवा, अशी प्रत्येक जण चढवून एकमेकांना ऑफर देत असल्याने भाटी अ‍ॅन्ड कंपनीच्या जाळ्यात हजारो जण अडकले. ज्यात विमा कंपन्यांचे एजंट, निवृत्त अधिकारी, विविध विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी आणि बेरोजगारांची संख्या मोठी आहे. महाठग भाटीच्या चिटींग कंपनीची कुणकुण लागताच उत्तर प्रदेशमधील बुद्धनगर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू झाली. तेथे भाटी आणि साथीदारांविरुद्ध १९ मे २०१९ ला त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर विविध राज्यात महाठग भाटी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. सध्या भाटी दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे.

नातेवाईक, मित्र, मित्रांचे मित्रही फसले६८ हजार रुपये जमा करून महाठग भाटी आणि साथीदारांच्या जाळ्यात स्वत:ला अडकवून घेणाऱ्या अनेकांनी नंतर कथित डीलरशिप घेण्यासाठी आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्यांना आपल्या साखळीत (चेन नेटवर्किंग) जोडणे सुरू केले. अशा प्रकारे आधी ते अडकले आणि नंतर त्यांनी आपले नातेवाईक, त्या नातेवाईकांचे नातेवाईक, आपले मित्र, मित्रांचे मित्र यांनाही महाठग भाटीच्या जाळ्यात अडकवले. हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे ! असा हा प्रकार ठरला.

बाईक बोट स्कीममहाठग भाटी आणि त्याच्या साथीदारांनी बनवाबनवीच्या या योजनेला बाईक बोट स्कीम असे नाव दिले होते. त्यात मानेवाडा, हुडकेश्वरमधील रामेश नत्थूजी वराडे (वय ४४), पत्नी तसेच मित्रांसह ४४ जणांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ८५ लाख, ३९ हजार ९८५ रुपये गुंतविले होते. या सर्वांनी गुन्हे आर्थिक शाखेत तक्रार नोंदवली होती. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी त्याची चौकशी केली. आज सायंकाळी या प्रकरणी हुडकेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी