शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:53 IST

विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

ठळक मुद्देखासदार महोत्सवात मांडला स्वातंत्रवीराचा झंझावाती प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्याचा कर जगाला सावरतो तो सावरकर. विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या खासदार महोत्सवात गुरुवारी ‘सावरकर एक झंझावात’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. सावरकरांचा झंझावाती जीवनप्रवास श्रोत्यांपुढे मांडताना शेवडे पुढे म्हणाले, आताच्या युवा पिढीला सगळेच इन्स्टंट हवे आहे. परंतु सावरकरांना एका वाक्यात सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच तरुणाईला अद्याप सावरकर समजलेले नाहीत. महाविद्यालय व शाळेत केवळ अक्षर ओळख होते. जगाच्या बाजारातच व्यवहार कळतो. सावरकर ओळखायचे असतील तर केवळ पुस्तकातून ते कळणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांचा त्याग, बलिदान, देशप्रेमाची भावना समजून घ्यावी लागेल. सावरकर म्हणजे, प्रज्ञा आणि प्रतिभेचे विलक्षण संगम होते. त्यांचे १२ खंडातील काव्य हे विद्रोहातून जन्माला आले. सावरकर हे एका देहात वसलेले विविध अवतार होते. त्यात कवी, नेता, सैनिक अशा सर्वांचा समावेश होता. त्यांनी देशहितासाठीच अभिनव भारतची स्थापना केली आणि तिचा कार्य उद्देश संपल्यावर १९५५ साली ही संघटना विसर्जितही केली. या उलट या देशातील एका महात्म्याने स्वातंत्र्यानंतर एका पक्षाला विसर्जित करण्याचा सल्ला देऊनही तो पक्ष मात्र आजही राजकारण करतोय, अशा शब्दात शेवडेंनी काँग्रेसचाही समाचार घेऊन टाकला. व्याख्यानाच्या प्रारंभी आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे व जयप्रकाश गुप्ता यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानाच्या मध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रोत्यांमध्ये बसून या वैचारिक मेजवानीचा आस्वाद घेतला. याच कार्यक्रमात शिवछत्र ढोलताशा पथकाचे वादनही झाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर