विदर्भात कोरोनाचे संकट अधिक गडद; मृत्यूचा आकडा हजारपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 08:28 AM2020-08-21T08:28:23+5:302020-08-21T08:30:14+5:30

नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

The crisis of the corona in Vidarbha is darker; The death toll is in the thousands | विदर्भात कोरोनाचे संकट अधिक गडद; मृत्यूचा आकडा हजारपार

विदर्भात कोरोनाचे संकट अधिक गडद; मृत्यूचा आकडा हजारपार

Next
ठळक मुद्दे१२४२ नवे रुग्ण, ५० मृतांची नोंदरुग्णांची संख्या ३३१७२ तर मृतांची संख्या १०४३

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भावरील कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. कोरोनाग्रस्तांसोबतच मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गुरुवारी मृतांच्या आकड्याने हजाराचा आकडा पार केला. यात ५० रुग्णांच्या मृत्यूची भर पडल्याने बळींची संख्या १०४३ वर पोहचली. १२४२ नवे रुग्ण आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या ३३१७२ झाली. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची तर यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली.

नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्येसोबतच मृत्यूसंख्येचे भयावह आकडे समोर येत आहे.  ९८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. रुग्णसंख्या १७७२२ झाली असून मृतांची संख्या ६२५ वर गेली आहे. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली. ११५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २४८२ झाली. चंद्रपूर जिल्ह्यात ५४ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२४९ तर मृतांची संख्या १३ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात ४६ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले. बाधितांची संख्या ५१२ वर पोहचली. बुलडाणा जिल्ह्यात ४२ रुग्ण व एकाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या २४३७ तर मृतांची संख्या ४१ झाली. गोंदिया जिल्ह्यात ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ९०२ झाली तर एका रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या १२ वर पोहचली. भंडारा जिल्ह्यात ३० रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णसंख्या ६९५ झाली. एका रुग्णाचा मृत्यूने मृत्यूची संख्या १० झाली. अमरावतीमध्ये २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बाधितांची संख्या ४१६१वर गेली. या शिवाय, अकोल्यात १४, गडचिरोलीत १० रुग्णांची नोंद झाली, तर वाशिम जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही.

मराठवाडा, खान्देशच्या तुलनेत विदर्भात मृत्यू कमी
मराठवाडा, खान्देशच्या तुलनेत विदर्भात मृत्यूची संख्या कमी आहे. गुरुवारी खान्देशात १८०३, मराठवाड्यात १३०६ तर विदर्भात १०४३ मृत्यूची नोंद झाली. नागपूर विभागाच्या तुलनेत अमरावती विभागात कमी मृत्यू आहेत. नागपुरातील सहा जिल्हे मिळून ६७५ तर अमरावती विभागातील पाच जिल्हे मिळून ३६८ मृत्यू झाले आहेत.

-असा गाठला मृत्यूचा आकडा महिना मृत्यूसंख्या मार्च १एप्रिल १२मे ५४जून ९१जुलै २२९आॅगस्ट ६५६

 

Web Title: The crisis of the corona in Vidarbha is darker; The death toll is in the thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.