शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुन्हेगारांची नव्या पोलीस आयुक्तांना सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 22:50 IST

नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपुरात येण्याच्या काही तासांपूर्वी या घटना घडल्या. गुन्हेगारांची ही नव्या पोलीस आयुक्तांना सलामी समजली जात आहे.

ठळक मुद्देएकाची हत्या, दोघांवर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. तर लकडगंज आणि अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या. नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी नागपुरात येण्याच्या काही तासांपूर्वी या घटना घडल्या. गुन्हेगारांची ही नव्या पोलीस आयुक्तांना सलामी समजली जात आहे.विलास रामाजी वरठी (वय ५४) हा धंतोलीतील यशवंत स्टेडियम जवळच्या फुटपाथवर राहत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री ७ वाजता तो फुटपाथवर बसून होता. तेथे आरोपी मुकेश आणि त्याचा भाऊ अमोल दादारावजी मांडवकर (रा. दिघोरी) आले आणि वरठीला चिडवू लागले. आमच्याकडे पाहून का थुंकला, अशी विचारणा करून आरोपींनी वरठी याच्याशी वाद घातला. एकमेकांना शिवीगाळ केल्यानंतर आरोपी मुकेश आणि अमोलने लोखंडी रॉडने वरठी यांच्यावर हल्ला चढवला. डोक्यावर जबर फटका बसल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वरठी यांचा मृत्यू झाला. भारत विलास वरठी (१८) याने दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपी मुकेश आणि अमोल मांडवकर या दोघांना गुरुवारी रात्री अटक केली.ट्रक ड्रायव्हरचा हल्लालकडगंजच्या वर्धमान नगरात एका ट्रान्सपोर्टरकडे अरुण जागोजी जुमळे (४८) आणि आरोपी गोपी दयाराम शाहू (३२) हे दोघे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला आहेत. त्यांच्यात आपसात थट्टामस्करीही चालायची. गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास आरोपी शाहूने जुमळे यांना बेवडा म्हणून चिडवले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. तो टोकाला गेल्यानंतर आरोपीने लोखंडी पाईपने जुमळे यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जुमळे यांचा मुलगा नवीन (१७) हा वडिलांना वाचविण्यासाठी पुढे धावला असता त्यालाही आरोपीने मारहाण केली. आजूबाजूची मंडळी धावली आणि त्यांनी आरोपीला आवरले. त्यानंतर स्वप्निल अरुण जुमळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शाहूला अटक केली.अशाच प्रकारे मानेवाडातील बजरंगनगरात राहणारा आरोपी भूषण उमाटे याने सुमित राजेंद्र डोंगरे याला गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास अ‍ॅक्टिव्हाने कट मारला. सुमितने आरोपी भूषणला जाब विचारला असता त्याने वाद घातला आणि आपल्या पाच साथीदारांना बोलवून सुमित डोंगरेवर हल्ला चढवला. त्याला लाठ्याकाठ्याने मारून गंभीर जखमी केले. डोंगरेने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.---

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी