कपिलनगरात जुगार खेळणाऱ्यांना अटक
नागपूर : समतानगर भूमि ले-आउट कपिलनगर येथे जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. आठ आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून ५.५० लाखाचा माल जप्त करण्यात आला.
अरविंद ऊर्फ भानु अरफीलाल पटेल (२३), तुफान रामभजन मेहता (२३), अमन श्रीराम बागोतिया (१९), शुभम युवराज बागडे (२५), साहिल विजय तांबे (२०), सुनील बद्रिप्रसाद यादव (३०), राजेश बालकृष्ण सामृतवार (२९) तथा रवि रामेश्वर बोंद्रे (२३) हे जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याजवळून ३७५० रुपये रोख, मोबाइल व दुचाकीसह ५.५० लाखाचा माल जप्त केला.
-----------------
इमारतीवरून पडून युवकाचा मृत्यू
नागपूर : बजेरिया येथील मारवाडी चाळीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून एका युवकाचा मृत्यू झाला. रतनकुमार मीना (३६, रा. सीकर, राजस्थान) असे मृताचे नाव आहे. तो इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून पडून जखमी झाला होता. त्याला मेयो रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
---------------
तकीया-सुदामनगरीत घरफोडी
नागपूर : तकीया आणि सुदामनगरी येथे चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह दोन लाखाचे दागिने चोरू नेले. २५ वर्षीय मो. अशफी हा पत्नीसोबत तकीया येेथे भाड्याने राहतो. पत्नी गर्भवती असल्याने अशफी तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन गेला होता. २६ जानेवारी रोजी चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलुप तोडून ५० हजार रुपयासह एक लाखाचा माल चोरून नेला. तसेच सुदामनगरी हुडकेश्वर येथील अनिल पलांदूरकर हे २६ जानेवारी रोजी कुटुंबासह बाहेर गेले होते. यादरम्यान चोरांनी त्यांच्या स्वयंपाक खोलीचे कुलूप तोडून घरातील एक लाख रुपये चोरून नेले.