शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एक फूल दो माली’, नागपूरमध्ये नव्या प्रियकराकडून जुन्यावर चाकूने वार

By योगेश पांडे | Updated: May 31, 2023 17:18 IST

मेकॅनिक असलेल्या सचिन बाबुदास महंत (३०, तरोडी) याचे एका महिलेसोबतच दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

नागपूर : एका मुलीवरच दोघांचा जीव जडल्यानंतर नव्या प्रियकराने जुन्या प्रियकराचा चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मेकॅनिक असलेल्या सचिन बाबुदास महंत (३०, तरोडी) याचे एका महिलेसोबतच दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून ती महिला त्याला टाळत होती. त्याने माहिती काढली असता स्नेहल घोडेस्वार (३८, न्यू शंकर नगर, दिघोरी नाका) याचेदेखील तिच्यावर प्रेम असून ते दोघे सोबत फिरतात अशी त्याला माहिती कळाली. यामुळे सचिन संतापला व त्याने महिलेशी वाद घातला. त्याने तिला गिफ्ट दिलेला मोबाईल परत मागितला.

मंगळवारी रात्री साडेदहा वाजता स्नेहलने सचिनला फोन करून मोबाईल परत घेण्यासाठी दिघोरी चौकात बोलविले. सचिन त्याच्या दोन मित्रांसह तेथे गेला. आरोपी स्नेहल पुलाजवळच उभा होता. तेथे गेल्यावर सचिनने मोबाईल परत मागितला असता स्नेहलने हातातील चाकूने त्याच्या मानेवर व पोटावर वार केले. यामुळे सचिन रक्तबंबाळ झाला व बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहून सचिनचे मित्र धावले. त्यांनी त्याला मेडिकल इस्पितळात दाखल केले. दरम्यान स्नेहल घटनास्थळावरून फरार झाला. सचिनच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात स्नेहलविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी रात्री शोध घेत त्याला अटक केली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी