शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

‘क्राईम ग्राफ’ वाढतोय...

By admin | Updated: February 4, 2015 01:00 IST

राज्याची उपराजधानी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ या वर्षात बहुतांश गुन्ह्यांमध्ये वाढ झाली.

वर्षभरात ११५ बलात्कार : ३ हजारांवर चोरीच्या प्रकरणांची नोंदनागपूर : राज्याची उपराजधानी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गृहनगर असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१३ च्या तुलनेत २०१४ या वर्षात बहुतांश गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. २०१४ मध्ये शहरात ११५ बलात्कार, १४५ अपहरण तर १०३ हत्येच्या घटनांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१३ व २०१४ या वर्षांत नागपूरमध्ये झालेल्या गुन्ह्यांबाबत विचारणा केली होती. यावर नागपूर पोलिसांनी विस्तृत माहिती उपलब्ध करून दिली. २०१३ मध्ये शहरात ८ हजार ३६६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. २०१४ मध्ये हाच आकडा ८ हजार ८१७ पर्यंत गेला. यातील ४ हजार ९२४ म्हणजेच केवळ ५६ टक्के गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना शक्य झाले. ‘चेन स्नॅचिंग’च्या २५६ घटनाशहरात दिवसेंदिवस ‘चेन स्नॅचिंग’चे प्रमाण वाढीस लागत आहे. २०१४ मध्ये सोनसाखळी हिसकावल्याच्या २५६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यातील केवळ ३३ टक्के प्रकरणांत आरोपींना अटक करण्यात आली. २०१३ मध्ये लुटमारीचा आकडा २४८ इतका होता. महिलांवरील अत्याचारामध्ये वाढशहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये २०१४ या वर्षात वाढ दिसून आली. २०१४ मध्ये ११५ महिलांवर बलात्कार झाल्याची प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१३ च्या तुलनेत हा आकडा २५ ने अधिक आहे. तर १७८ बालके व महिलांचे अपहरण करण्यात आले.८ गुन्हेगार टोळ्या गजाआडशहरातील निरनिराळ्या भागांत गुन्हेगारी टोळ््या निर्माण झाल्या आहेत. २०१३ व २०१४ मध्ये ८ गुन्हेगार टोळ््यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यात एकूण ५६ गुन्हेगार होते. शिवाय २ वर्षांत १३४ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले.