शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दोन लग्नांची लपाछुपी अन् तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी; नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2022 18:26 IST

अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी पती देत असून नराधमापासून तिचा बचाव कसा करावा यासाठी महिलेची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देनराधम पती तिसऱ्या पत्नीच्या मुलीच्या जीवाच्या मागे

योगेश पांडे

नागपूर : वयाच्या २३ व्या वर्षी ती त्याच्या प्रेमात वेडी झाली आणि परंपरा-प्रतिष्ठा या साऱ्या गोष्टी बाजूला सारत घरच्यांच्या मर्जीविरोधात जाऊन लग्न केले. राजाराणीचा संसार आणखी फुलत जाईल जाईल असे स्वप्न रंगवत असतानाच तिच्या पतीचा काळा चेहरा समोर आला. पतीने अगोदर एक नव्हे तर दोन लग्न केल्याची बाब समोर आली आणि तिच्या आयुष्याच्या स्वप्नांचा आरसा खाडकन् फुटला. मात्र संकट तिथेच थांबले नाही. अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला जिवंत गाडण्याची धमकी पती देत असून नराधमापासून तिचा बचाव कसा करावा यासाठी तिची धावपळ सुरू आहे.

एखाद्या चित्रपटाची स्क्रिप्ट शोभेल असा हा प्रकार जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. जरीपटक्यातच माहेर असलेल्या संबंधित महिलेचे मनीषनगरात राहणाऱ्या राहुल बालेकरवर प्रेम जडले. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या, मात्र जातीच्या मुद्द्यावरून तिच्या घरून प्रचंड विरोध होता. तिने घरच्यांपेक्षा त्याच्या प्रेमाला अधिक महत्त्व दिले व काही परिचितांच्या उपस्थितीत २०१७ मध्ये कोराडी येथे त्याच्याशी लग्न केले.

लग्नानंतरचे काही दिवस अगदी स्वप्नवत गेले. मात्र त्यानंतर राहुलचे अगोदर दोन लग्न झाल्याची बाब तिच्या समोर आली. ती मनातून हादरून गेली होती. माहेरच्यांना दूर करून ज्याच्याजवळ आली तो असा वागेल यावर तिला विश्वासच बसत नव्हता. ती जेव्हा त्याला विचारणा करायची तेव्हा तो मारहाण करायचा. त्यातच २०१९ मध्ये तिला मुलगी झाली व तिच्या भविष्यासाठी ती त्याचा छळ सहन करत त्याच्याच घरी रहायला लागली. दारू पिऊन तो तिला खूप मारहाण करायचा.  अखेर त्याच्या छळाला कंटाळून ती डिसेंबर २०२१ मध्ये माहेरी परतली. त्यानंतरही त्याचा त्रास सुरूच होता.

११ जुलै रोजी तो सकाळी तिच्या माहेरी पोहोचला व त्याने शिवीगाळ सुरू केली. त्याने महिलेला व तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘तीन वर्षांच्या मुलीला तर जिवंतच गाडून टाकेन’ या त्याच्या शब्दांनी महिला आणखी हादरली. ज्याच्यावर जीव ओवाळला होता तो आपल्याच लेकीचा जीव घेण्याची भाषा करतो आहे हे पाहून तिने अखेर जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी राहुलविरोधात फसवणुकीसह पाच विविध गुन्हे नोंदविले आहेत.

माहेरच्यांनी दिला हात

राहुलशी लग्न करण्याच्या महिलेच्या निर्णयाला माहेरच्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. मात्र महिलेने त्यांच्या विरोध झिडकारून त्याच्याशी लग्न केले होते. हा प्रकार झाल्यावर माहेरच्या लोकांनीच तिला मदतीचा हात दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारnagpurनागपूर