शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील क्रिकेट सट्टा बुकी सुभाष शाहूच्या मारेकऱ्यास जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:08 IST

प्रसादामधून पोटॅशियम सायनाईड खाऊ घालून बुकी व मांडवली किंग सुभाष शाहूची हत्या करणाऱ्या नदीम अहमद ऊर्फ लकी गुलाम नबी (४०) याला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निकाल : प्रसादातून दिले होते सायनाईड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रसादामधून पोटॅशियम सायनाईड खाऊ घालून बुकी व मांडवली किंग सुभाष शाहूची हत्या करणाऱ्या नदीम अहमद ऊर्फ लकी गुलाम नबी (४०) याला सत्र न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दुसरा आरोपी महेश ऊर्फ गमछू नामदेव लांबट (५३) याला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. नदीम हा वेलकम सोसायटी, कोराडी तर, गमछू हा जुनी शुक्रवारी येथील रहिवासी आहे. आरोपीने एखाद्या चित्रपटाचे कथानक शोभेल अशा पद्धतीने शाहूला संपवले होते. या हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली होती. २८ सप्टेंबर २०११ रोजी नदीमने साधूची वेशभूषा करून रात्री ९.३० च्या सुमारास कोतवाली पोलिसांच्या हद्दीत शाहूला गाठले. काहीवेळ धार्मिक मुद्यांवर वार्तालाप केल्यानंतर नदीमने शाहूला प्रसाद दिला. प्रसाद सेवन केल्यानंतर शाहूची प्रकृती खालावली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. परंतु, आरोपीचा सुगावा न लागल्यामुळे प्रकरण थंडबस्त्यात गेले होते. चार वर्षानंतर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी गमछूला घेरले. गमछू हा शाहूचा अत्यंत विश्वासू साथीदार होता. त्यामुळे पोलिसांनी त्याची सखोल विचारपूस केली. त्यातून नदीमने शाहूची हत्या केल्याचे पुढे आले. त्यामुळे ५ एप्रिल २०१६ रोजी नदीमला अटक करण्यात आली. पोलिसांनी न्यायालयात ५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. नदीम शेखतर्फे अ‍ॅड. आर. बी. गायकवाड, गमछूतर्फे अ‍ॅड. आर. के. तिवारी तर, शासनातर्फे अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर