शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शेतकऱ्यांमध्ये ‘व्हिजन’ निर्माण व्हावे : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:21 IST

आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्दे‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या उपस्थितीत ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खा.कृपाल तुमाने, खा.विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, ‘अ‍ॅग्रोव्हिजन’च्या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. चार वर्षांअगोदर शेतकरी आत्महत्या हा मोठा चिंतेचा मुद्दा होता. मात्र मागील चार वर्षांत महाराष्ट्र व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळेच येथील शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले. 
म्हणून वाढले उत्तर प्रदेशमधील अपराधउत्तर प्रदेशमध्ये मागील १५० वर्षांपासून उसाला ‘कॅश क्रॉप’ मानण्यात येते. मात्र मागील १०-१५ वर्षातील राज्यातील तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे साखर उत्पादकांना फटका बसला व मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद पडले. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अपराध वाढले, दंगे वाढले आणि लोक पलायन करायला लागले, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. आमच्या शासनकाळात आम्ही १२१ साखर कारखाने सुरू केले आहेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचे वाटपदेखील केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
सहा जिल्हे ‘डिझेलमुक्त’ करणार : गडकरीयावेळी नितीन गडकरी यांनी विदर्भ व महाराष्ट्रातील शेतीमध्ये होत असलेले बदल व प्रगतीवर भाष्य केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडण्याची गरज आहे. तणसापासून जैवइंधन निर्मिती होऊ शकते व यावर ‘ट्रॅक्टर’देखील चालविले जाऊ शकते. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांत सर्व ‘ट्रॅक्टर’ डिझेल नव्हे तर जैवइंधनावर चालतील. यामुळे रोजगाराचीदेखील निर्मिती होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आज मुंबईत तांदळापेक्षा भांडे घासण्याची माती महाग आहे. ऊस सोडून इतर पिकांमुळे हवा तसा नफा मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायांकडेदेखील वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असेदेखील गडकरी म्हणाले. 

पाऊस कमी, पण उत्पादन कमी होणार नाही : मुख्यमंत्रीराज्य शासनाने मागील चार वर्षांत सिंचनक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस झाला होता. तेव्हा १३७ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. २०१७-१८ मध्ये सरासरीच्या ८४ टक्केच पाऊस झाला. तरीदेखील उत्पादन १८० लाख मेट्रिक टन इतके होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीyogi adityanathयोगी आदित्यनाथ