शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ७० लाखांच्या लुटमारीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:29 IST

कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या लुटारूंचा छडा लावण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी यश मिळाले.

ठळक मुद्देसहा लुटारू ताब्यात : गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळसा व्यापारी सचिन कैलास अग्रवाल आणि त्यांच्या रोखपालावर सशस्त्र हल्ला करून ७० लाख रुपये लुटणाऱ्या लुटारूंचा छडा लावण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पथकाला गुरुवारी यश मिळाले.विदर्भातील मोठा कोळसा व्यापारी म्हणून कैलास अग्रवाल यांचे नाव आहे. सदरमधील छावणी परिसरात त्यांचे निवासस्थान आहे. ते आणि त्यांचे बंधू दिलीप अग्रवाल यांचे भंडारा मार्गावरील पॉवर हाऊस चौकात शिवम् टॉवरमध्ये डी. के. अ‍ॅन्ड कंपनी तसेच आयाती मिनरल्स नावाने कार्यालय आहे. दुसºया माळ्यावरील या कार्यालयातून २९ जूनच्या रात्री ८.१० वाजता कैलास अग्रवाल यांचा मुलगा सचिन तसेच रोखपाल राजेश भिसीकर सुमारे ७० लाखांची रोकड घेऊन घरी जाण्यासाठी निघाले होते. राजेशच्या हातात नोटांनी भरलेली बॅग होती. ते कारकडे जात असताना अचानक समोर आलेल्या लुटारूंनी सचिन आणि राजेशच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि राजेशपासून नोटांनी भरलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. राजेशने बॅग घट्ट पकडून ठेवल्यामुळे लुटारूंनी प्रारंभी पिस्तुलाचा धाक दाखवला. त्याला मानत नसल्याचे पाहून लुटारूंनी धारदार शस्त्राने राजेशच्या हातावर घाव मारले आणि नोटांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढला. या धाडसी लुटमारीचा लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल झाला होता. लकडगंज तसेच परिमंडळ तीन मधील सहा पोलीस पथके आणि गुन्हे शाखेची सहा पथके या लुटमारीचा समांतर तपास करीत होती. तब्बल सातव्या दिवशी, गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाला या लुटमारीतील आरोपीचा छडा लावण्यात यश मिळाले. वृत्त लिहिस्तोवर सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त करण्यात आली. अन्य काही आरोपींचा पोलीस शोध घेत होते.

टॅग्स :Crimeगुन्हाRobberyदरोडा