शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गुराख्याचा संप अन् अख्खे गाव चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:09 IST

रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले आहे. परिणामी, पाच दिवसांपासून ही गुरे गोठ्यातच बांधून आहेत. हा प्रकार टेंभूरडोह (ता. सावनेर) येथे नुकताच घडला.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील टेंभूरडोह येथील प्रकारजनावरे पाच दिवसांपासून गोठ्यात बांधून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : रेती वाहतूकदाराने पांदण रस्त्याने रेतीची वाहतूक करायला सुरुवात केली असून, त्या पांदण रस्त्याने गुराखी गावातील जनावरे चारायला न्यायचा. गुरांमुळे रेतीवाहतुकीस अडसर निर्माण होत असल्याने रेतीवाहतूकदाराने गुराख्यास धमकावणे सुरू केले. त्यामुळे गुराख्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले आहे. परिणामी, पाच दिवसांपासून ही गुरे गोठ्यातच बांधून आहेत. हा प्रकार टेंभूरडोह (ता. सावनेर) येथे नुकताच घडला.मोतीराम वाघाडे आणि त्याची पत्नी रेखा वाघाडे, रा. टेंभूरडोह, ता. सावनेर हे गावातील शेतकऱ्यांची गुरे रोज चारायला नेतात. त्यावर त्यांची उपजीविका चालते. तो सर्व गुरे सकाळी चारायला नेण्यापूर्वी गावालगतच्या वडाच्या झाडाखाली गोळा करतो. गावाजवळ जंगल नसल्याने तो ही सर्व गुरे शिवारात व पांदण रस्त्याच्या कडेला चारतो आणि रात्री परत आणतो.अमर तांडेकर (३१) हा गेल्या दीड महिन्यांपासून पांदण रस्त्याने ट्रकद्वारे रेतीची वाहतूक करीत आहे.जनावरांमुळे त्याच्या रेतीवाहतुकीला अडसर निर्माण होत असून, अनेकदा त्याचे रेतीचे ट्रक अडकून पडले. त्यामुळे अमरने वाघाडे दाम्पत्याला पांदण रस्त्याच्या कडेला गुरे चारण्यास व कन्हान नदीवर पाणी पाजायला आणण्यास मनाई करत धमकावणे सुरू केले. वाघाडे दाम्पत्य जुमानत नसल्याचे लक्षात येताच अमरने त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मोतीराम वाघाडे यांनी खापा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून तपासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे वाघाडे दाम्पत्याने गावातील गुरे चारायला नेणे बंद केले. परिणामी, पाच दिवसांपासून शेतकऱ्यांना त्यांची गुरे गोठ्यातच बांधून ठेवावी लागत असून, तिथेच चारापाणी करावा लागत आहे. त्यामुळे रेतीवाहतूकदारावर कारवाई करून ही समस्या सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Strikeसंपcowगाय