शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

विदेशातही गाय मारणे मानतात पाप

By admin | Updated: October 25, 2015 03:04 IST

गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर देशातील राजकारण ढवळून निघाले असून गोहत्याबंदीचा विषय चर्चेत आहे.

गोहत्याबंदीचे सरसंघचालकांकडून समर्थन : संस्कृतीमध्ये बदल नकोनागपूर : गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर देशातील राजकारण ढवळून निघाले असून गोहत्याबंदीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गोहत्याबंदीचे समर्थनच केले आहे. अफ्रिकेतील देशांमध्ये हलाखीच्या परिस्थितीत गायीचे रक्त प्राशन करण्यात येते, परंतु त्या बदल्यात तिचे पोषण करण्यात येते. गायीला मारणे तेथेही पाप समजले जाते अशा शब्दांत त्यांनी गोहत्याबंदीच्या मुद्यावर भाष्य केले. नागपुरातील आर. एस. धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘आयसीसीएस’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्) संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे जगातील प्रतिध्वनी’ या विषयावर शनिवारपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा हे उपस्थित होते. भारताला पुरातन संस्कृती लाभली आहे. परंपरा बदलल्या तरी चालतील परंतु संस्कृती बदलायला नको. भारताच्या संस्कृतीत वैश्विक दृष्टी आहे अन् जगाला आज तिची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशातील संस्कृतीचा प्रसार होणे अपेक्षित होते. परंतु व्यक्तिवाद आणि कुटुंबवादावर जास्त भर देण्यात आला व देशाच्या संस्कृतीचे पोषण झालेच नाही. अगदी देशातील स्वातंत्र्यसंग्रामात लढणाऱ्या व्यक्तींवर ‘नेहरू मेमोरिअल’च्या माध्यमातून प्रकाश टाकला तरी भगवीकरणाचा आरोप होतो. संस्कृतीची व्याख्या आपल्या देशात करणे कठीणच आहे, असे महेश शर्मा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यांवर अनावश्यक टीका करण्यात येत आहे. मोदी हे जगभरात भारताच्या शक्तीस्थळांचा प्रसार करत असून खऱ्या अर्थाने ते भारतीय संस्कृतीचे दूत आहेत. भारताबाहेरही भारतीय संस्कृती जपणारे अनेकजण राहतात. पर्यटनाच्या माध्यमातून, नागरी विमानवाहतुकीच्या पंखाचा उपयोग करून घेत, साऱ्या जगभर समृद्ध आणि व्यापक भारतीय संस्कृती पोहोचवणे हे आपले महत्त्वाचे ध्येय आहे, असे डॉ. महेश शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या निमिताने संकलित शोधनिबंधांच्या ग्रंथाचे आणि अभ्यासक्रमांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या परिषदेत आयोजित दहा सत्रांमध्ये भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विचारप्रणालीविषयक शोधनिबंधाचे सादरीकरण केले जाईल. यावेळी धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जोशी, सचिव दत्ताजी टेकाडे, ‘आयसीसीएस’चे अध्यक्ष अरुण चिंचमलातपुरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या नायर व संयोजक डॉ. मंजुश्री सरदेशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.भागवतांचे ‘गरुडा’स्त्रदेशात प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेली नावे देण्यावर विवाद होतो त्याबद्दल डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी भाष्य केले. इंडोनेशियामध्ये आघाडीची विमानकंपनी ‘गरुडा-इंडोनेशिया’ हिला पुराणांमधील गरुडाचे स्थान लक्षात घेऊन नाव देण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात अशी नावे देण्याचा प्रयत्न झाला तर मात्र गोंधळाला सुरुवात होते, असे ते म्हणाले. त्यांचा रोख केंद्रातील विरोधी पक्ष व डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर होता. डॉ. महेश शर्मा यांनीदेखील सरसंघचालकांचीच री ओढत असे प्रयत्न झाले तर भगवीकरणाचे आरोप होतात असे वक्तव्य केले. परंतु जर नवीन प्रकल्पांना अशी भारतीय संस्कृतीशी जुळलेली नावे देण्याचा प्रस्ताव आला तर त्यांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.