शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबरला न्यायालयीन कामकाज राहणार बंद ! बार कौन्सिलचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:19 IST

Nagpur : राज्यामध्ये वकिलांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध आणि वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्यासाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाच्यावतीने पारित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यामध्ये वकिलांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध आणि वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करण्यासाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा ठराव बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवाच्यावतीने पारित करण्यात आला आहे. २९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे बार कौन्सिलची सर्वसाधारण सभा झाली. दरम्यान, या दोन्ही मुद्यांवर सखोल चर्चा करून हा ठराव पारित करण्यात आला. 

काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये एका साक्षीदाराने  उलट तपासणीच्या प्रश्नामुळे चिडून संबंधित वकिलावर प्राणघातक हल्ला केला. यापूर्वीही राज्यातील विविध भागात अनेक वकिलांना मारहाण झाली आहे. तसेच, काही वकिलांची हत्याही केली गेली आहे. त्यामुळे वकील संरक्षण कायदा तातडीने लागू करणे आवश्यक आहे, असे कौन्सिलचे म्हणणे आहे. कौन्सिलच्या ठरावाची प्रत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि जिल्हा न्यायालयांच्या प्रधान न्यायाधीशांना पाठविण्यात आली आहे. सर्व जिल्हा व तालुका वकील संघटनांनी या ठरावावर अंमलबजावणी करावी, असे आवाहन कौन्सिलने केले आहे.

कायद्याच्या मसुद्यात सुचविल्या सुधारणा

वकील संरक्षण कायद्याचा मसुदा सर्व वकील संघटनांना पाठविण्यात आला होता. त्यानंतर अनेक वकील संघटनांनी या मसुद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा सुचविल्या. दरम्यान, हा कच्चा मसुदा राज्याच्या महाधिवक्त्यांकडे पाठविण्यात आला. परंतु, त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नाही, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lawyers' strike on November 3rd protesting repeated attacks: Bar Council resolution.

Web Summary : Bar Council calls for strike on November 3rd, protesting attacks on lawyers and demanding immediate lawyer protection law implementation. The council has sent the resolution to the Chief Justice of the High Court.
टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय