शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सूरजागड खाण विस्ताराविरुद्धच्या जनहित याचिका न्यायालयाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:18 IST

हायकोर्टाचा निर्णय : नियमांचे काटेकोर पालन केल्याने लॉयड्स मेटल कंपनीला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गडचिरोली जिल्ह्यामधील बहुचर्चित सूरजागड लोह खनिज खाणीच्या विस्ताराला विरोध करणाऱ्या दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावल्या. खाणीच्या विस्ताराला परवानगी देताना बंधनकारक प्रक्रियेचे व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. तसेच, याचिकाकर्ते समरजित चॅटर्जी यांच्या हेतूवर आणि प्रामाणिकतेवर संशय उपस्थित करण्यात आला.

न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी हा निर्णय गेल्या ९ मे रोजी लिहून घेतला होता. त्याची प्रत गुरुवारी रात्री न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली. या निर्णयामुळे खाण संचालक लॉयड्स मेटल अॅण्ड एनर्जी कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. याचिकाकर्ते चॅटर्जी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील रहिवासी असून ते खाणीकर्म कंत्राटदार होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी हा व्यवसाय बंद करून आयुर्वेदिक औषधे विकण्याचे कौटुंबिक काम सुरू केले. त्यांचे वार्षिक उत्पन्न चार-पाच लाख रुपयेच आहे. असे असताना ते ३०० किलोमीटर दूर असलेल्या सूरजागड खाणीला विरोध करीत असल्याची बाब न्यायालयाला खटकली. त्यांचा सूरजागड खाणीशी काहीच संबंध नाही. या खाणीमुळे त्यांची कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे त्यांना खाणीला विरोध करण्याचा अधिकार नाही. त्यांचा खाणीला विरोध करण्याचा उद्देश प्रामाणिक नसल्याचे दिसून येते. याकरिता, ते दंड ठोठावण्यासाठी पात्र आहेत; पण त्यांच्याकडून दंड वसूल होण्याची शक्यता नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

असे होते आरोपसूरजागड लोह खनिज खाणीची वार्षिक उत्पादन क्षमता ३० लाख टनावरून वाढवून एक कोटी टन करण्यासाठी १८ जुलै २०२२ रोजी टर्म ऑफ रेफरन्स (टीओआर) आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यावरण मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर वार्षिक उत्पादन क्षमता एक कोटी मॅट्रिक टनावरून वाढवून सहा कोटी मॅट्रिक टन करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०२४ रोजी टीओआर जारी करण्यात आला. असे करताना संबंधित ऑफिक मेमोरंडम आणि एसओपीचे पालन करण्यात आले नाही, असे याचिकाकर्त्याचे आरोप होते. परंतु, न्यायालयाला या आरोपांमध्ये काहीच तथ्य आढळून आले नाही.

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय