आॅनलाईन ठकबाजाला न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:02 PM2017-11-11T22:02:52+5:302017-11-11T22:21:51+5:30

‘नोकरी डॉट कॉम ’ वर नोकरीविषयक माहिती लोड करून नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाला १७ लाख ६८ हजार ६४३ रुपयांनी गंडा घालणाऱ्या  उत्तर प्रदेशच्या एका आॅनलाईन ठकबाजाचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.

Court bribery to online fraud | आॅनलाईन ठकबाजाला न्यायालयाचा दणका

आॅनलाईन ठकबाजाला न्यायालयाचा दणका

Next
ठळक मुद्देजामीन नाकारलाहिंगण्यातील तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून १७.६८ लाखांनी गंडा‘नोकरी डॉट कॉम’ चा असाही दुरुपयोग


अॉनलाईन लोकमत
नागपूर : ‘नोकरी डॉट कॉम ’ वर नोकरीविषयक माहिती लोड करून नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाला १७ लाख ६८ हजार ६४३ रुपयांनी गंडा घालणाऱ्या  उत्तर प्रदेशच्या एका आॅनलाईन ठकबाजाचा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी यांच्या न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
विक्कीसिंग नारायणसिंग (२०), असे या ठकबाजाचे नाव असून तो उत्तरप्रदेशच्या गाजीयाबाद येथील रहिवासी आहे.
हिंगणा पोलिसांनी नवी दिल्ली येथे जाऊन ५ आॅक्टोबर २०१७ रोजी विक्की सिंग, त्याचा साथीदार शुभमराज संजय पांडे (२०) रा. गौतम बुद्धनगर यांना अटक करून ट्रान्झिट रिमांडवर नागपुरात आणले होते. या ठकबाजांचा आणखी एक साथीदार अंकित सुबोध गुप्ता रा. नोएडा हा पोलिसांना ‘मोस्ट वॉन्टेड’ आहे. परंतु तो फरार आहे.
या त्रिकुटांनी हिंगणा गुमगाव येथील आशिष लक्ष्मण गांजुडे (२४) याची अवाढव्य रकमेने १५ एप्रिल २०१७ ते ५ आॅगस्ट २०१७ या काळात फसवणूक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार या ठकबाजांची कोणतीही स्वत:ची कंपनी नसताना त्यांनी केवळ विविध कंपन्यांच्या नावांचा उल्लेख करून केवळ तोतयागिरी केली. त्यांनी नोकरी डॉट कॉम नावाच्या वेबसाईटवर नोकरीविषयक माहिती लोड केली होती. आशिषला नोकरीची गरज असल्याने त्याने प्रतिसाद दिला होता. लागलीच या त्रिकुटांनी त्याला आपल्या जाळ्यात अडकवणे सुरू केले होते. आकर्षक नोकरीचे आमिष दाखवीत या ठकबाजांनी त्याच्याशी वेळोवेळी संपर्क साधून त्याला उदयवीर, हरिषकुमार, मनोज गुप्ता यांच्या स्टेट बँकेतील खात्यात, अमरसिंग याच्या पंजाब नॅशनल बँक आणि युको बँकेतील खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले होते. त्यानुसार आशिष हा पैसे जमा करीत गेला होता. त्याने आरोपींच्या वेगवेगळ्या पेटीएम अकाऊंटमध्येही पैसे जमा केले होते.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने हिंगणा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. त्यावरून २६ सप्टेंबर रोजी हिंगणा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४१९, ४२०, ३४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (क),(ड) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून या त्रिकुटाचा शोध लावला. परंतु दोघेच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलिसांनी त्यांचा पोलीस कोठडी रिमांड घेतला. परंतु त्यांना रक्कम जप्त करता आली नाही.
पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल, टेलिफोन, लॅपटॉप, इतर दस्तावेज जप्त केले आहे. दोन्ही आरोपी नागपूर कारागृहात आहे. त्यापैकी विक्कीसिंग याने जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मुकुंद कमलाकर यांनी बाजू मांडली. पोलीस निरीक्षक ए. एस. सुगांवकर हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Court bribery to online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.