शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

लग्नाच्या वाढदिवशीच दांपत्याने केली आत्महत्या, बाळ होत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

By योगेश पांडे | Updated: January 7, 2025 18:32 IST

मार्टिननगरात खळबळ : व्हिडीओ शेअर करत सांगितले कारण

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्षाचा पहिलाच आठवडा नागपुरकरांना मोठा धक्का देणारा ठरला आहे. बाळ होत नसल्याने नैराश्यात असलेल्या एका दांपत्याने लग्नाच्या वाढदिवशीच आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्या करण्याअगोदर सोशल माध्यमांवर व्हिडीओ शेअर करत आत्महत्येचे कारण स्पष्ट केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिननगरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जेरील उर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रीप (५४) व ॲनी जेरील मॉनक्रीप (४५) असे आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेरील मॉनक्रीप हे काही वर्षांपूर्वी शेफचे काम करत होते तर त्यांची पत्नी घरकाम करायची. मात्र काही काळापासून ते बेरोजगार होते. त्यांच्यावर कर्जदेखील झाले होते. लग्नाला २५ हून अधिक वर्ष उलटून गेल्यावरदेखील त्यांना बाळ होत नव्हते. त्यामुळे त्यांचा तणाव आणखी वाढला होता. या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. सहा जानेवारी रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. दिवसभर ते लोकांसमोर अगदी सहजपणे वावरत होते. मात्र त्यांच्या मनातील वादळाची कुणालाही कल्पना आली नाही. त्यांनी नातेवाईकांच्या शुभेच्छांचादेखील स्वीकार केला. मध्यरात्रीनंतर त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंतदेखील त्यांचा दरवाजा बंदच होता. त्यामुळे शेजारील महिलेने त्यांना आवाज दिला. आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. तिने आरडाओरड करत इतर शेजाऱ्यांना एकत्रित केले. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

व्हॉट्सअपवर ठेवले स्टेटसजेरील व ॲनीने लग्नाच्या पोशाखातच गळफास घेतला. सोमवारी ते दोघेही फिरायला गेले होते व डिनर डेटलादेखील गेले. याअगोदर त्यांनी व्हिडीओ काढला व तो व्हॉट्अपवर स्टेटस म्हणून ठेवला. यात त्यांनी आत्महत्येचे कारण सांगितले व कुटुंबियांची माफीदेखील मागितली. सोबतच त्यांनी सुसाईड नोटदेखील लिहीली होती. परिस्थितीला कंटाळूनच हे पाऊल उचलत असल्याचे त्यात नमूद आहे.

अंत्यविधीसाठी ठेवले पैसे

सुसाईड नोटसह पोलिसांना घरातून स्टॅम्प पेपर आणि ७५ हजार रुपये रोख सापडले. अंत्यविधीसाठी ७५ हजार रुपये घरात ठेवल्याचे या दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. आपले राहते घर कुणाला द्यावे याची सुद्धा नोंद त्यांनी स्टॅम्प पेपर वर केली आहे.

प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवटजेरील व ॲनी यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र कर्ज व बाळ होत नसल्याने ते तणावात होते. नातेवाईकांना अनेकदा त्यांची समजूत काढली होती. सर्वच बाजूनी निराश झाल्याने ते गेल्या दोन महिन्यांपासून निराशेच्या गर्तेत गेले. दोन महिन्यांपासून दोघेही आत्महत्येचा विचार करत होते

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर