शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

देशाचा बजेट संतुलित, उद्योगांना संधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:15 IST

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प संतुलित आणि लघु व मध्यम उद्योगांना संधी देणारा असल्याचा सूर वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंटनी (सीए) येथे काढला. सीएंनी काही मौलिक सूचना यावेळी केल्या. कर विषयक विशेष घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या, असेही मत सीएंनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअर्थसंकल्पावर चार्टर्ड अकाऊंटंटची प्रतिक्रिया : नागपूर सीए संस्थेतर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प संतुलित आणि लघु व मध्यम उद्योगांना संधी देणारा असल्याचा सूर वरिष्ठ चार्टर्ड अकाऊंटंटनी (सीए) येथे काढला. सीएंनी काही मौलिक सूचना यावेळी केल्या. कर विषयक विशेष घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित होत्या, असेही मत सीएंनी व्यक्त केले.प्रत्यक्ष करावर सीए कपिल बहरी म्हणाले, काही ठोस तरतुदींमुळे अर्थसंकल्प उत्तम आहे. अर्थसंकल्पामध्ये पूर्वपरिवर्तनीय दुरुस्त्या करण्यात आल्या नाहीत. त्यांनी इक्विटी आणि म्युच्युअल फंडांवर दीर्घ मुदतीचा कॅपिटल गेन टॅक्स आणि त्यावरील गुंतागुंतीची माहिती दिली. त्यांनी ई-मूल्यांकनात असलेल्या जटिलतेबद्दल आपले विचार मांडले. अप्रत्यक्ष करावर सीए आनंद ढोखा यांनी मत मांडले.कॅपिटल बाजारावर सीए रणजित दाणी यांनी भाष्य केले. भविष्यात इक्विटी आणि डेट मार्केटमध्ये सुधारणा अपेक्षित आहे. त्यांनी सरकारची प्रशंसा केली. सरकारने खर्च कमी केलेला नाही आणि पूर्वीच्या तरतुदींमध्ये सुरू असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली. त्यामुळे सामान्य जनतेच्या नजरेत सरकारचे पतधोरण वाढेल.सीए सुरेश राठी यांनी व्यापार आणि उद्योगावर विचार व्यक्त केले. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी जीडीपी विकास आठ टक्के असावा. दीर्घकाळात अधिक आर्थिक व्यवहार्यता असलेल्या नवीन क्षेत्रांत उद्योग उभारण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आयसीएआयचे माजी अध्यक्ष जयदीप शाह यांनी वित्त विधेयक-२०१८ वर मत मांडले.तत्पूर्वी सीए नागपूर संस्थेचे उपाध्यक्ष उमंग अग्रवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अर्थसंकल्पातील तरतुदींचा प्रमुख उद्देश प्रगतिशील विकासशील अर्थव्यवस्थेकडे आहे. नवीन भारतासाठी सामाजिक सुरक्षिततेवर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले.सीए समीर बाकरे आणि सीए मिलिंद पटेल या सीए संस्थेच्या दोन्ही माजी अध्यक्षांनी कार्यक्रमाचे प्रभावीपणे संचालन केले. सीए नागपूर शाखेचे सचिव सुरेन दुरगकर यांनी आभार मानले.कार्यक्रमात सीए स्वप्निल घाटे, सीए किरीट कल्याणी, सीए संजय एम अग्रवाल, सीए जितेन सागलानी, सीए संजय अग्रवाल, सीए साकेत बगडिया, ओ.एस. बगडिया, प्रेम आशुतोष, इशा उमभरकर आणि १८० पेक्षा जास्त चार्टर्ड अकाऊंटंट उपस्थित होते.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८nagpurनागपूर