नागपूर : देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचे बलिदान देश कधीच विसरणार नाही, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदरांजली अर्पण केली.
राजीव गांधी यांच्या ७७ व्या जयंती दिनानिमित्त राजीव गांधी चौक, वर्धा रोड येथे स्थापित पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले, माजी आ. दीनानाथ पडोळे, तात्यासाहेब मते, जानबा मस्के, संजय शेवाळे, अशोक काटले, श्रीकांत शिवणकर, अशोक राऊत, सरदार रवींद्र मुल्ला, भाईजी मोहोड, मच्छिंद्र आवळे, बबलू चौहान, प्रमोद जोंधळे, वसंत घटाटे, मंगला महाजन, अशोक माहूरकर, मोरेश्वर जाधव, राहुल येन्नावार, विनोद शेंडे, सूरज बोरकर, विजय मसराम, राजेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते.