शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलमूत्राच्या योग्य विल्हेवाटीमुळेच देश स्वच्छ होईल : सोपान जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:40 IST

देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘शरीर से नदी की दुरी’ यावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, बीजोत्सव, कॅग आणि निसर्गायनच्या संयुक्त विद्यमाने ‘शरीर से नदी की दुरी’ या विषयावर सोपान जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ते म्हणाले, लडाखचे लोक छागरा नावाचे शौचालय वापरतात. टाकीत मलावर माती टाकण्यात येत असल्यामुळे तो मल सुकल्यावर त्याचा शेतीत खत म्हणून वापर होतो. तिरुचेरापल्लीचे नागरिक इकोसॅन हे शौचालय वापरतात. इकोसॅनमध्ये मल, मूत्र, पाणी वेगवेगळे करण्याची सुविधा आहे. या शौचालयामुळे मलाची माती होऊन त्याची दुर्गंधी येत नाही. मलामुळे खत आणि मूत्रातून शेतकऱ्यांना नायट्रोजन मिळते. या दोन्ही बाबी शेतीसाठी उपयुक्त आहेत. बंगळुरूमध्ये नायट्रोजन मिळत असल्यामुळे घाण पाणी शेतात टाकतात. परंतु श्रीमंत नागरिक शौचालयात केमिकल, सौंदर्य प्रसाधने वापरत असल्यामुळे तेथील नागरिक श्रीमंत वस्तीतील शौचालयाचे पाणी शेतात वापरत नाहीत. डीवॉट्स पद्धतीतही घाण पाण्याला पुनर्वापर करण्यायोग्य बनविल्या जाते. हे पाणी कूलर, झाडांसाठी वापरता येते. कोलकातामध्ये घाण पाण्यात मासेमार माश्यांचे उत्पादन घेतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात मासे मिळून शहरातील घाण पाण्याचा बंदोबस्त होतो. त्यामुळे मल-मूत्र-घाण पाणी वेगवेगळे करण्याच्या पद्धतीचा सगळीकडे वापर केल्यास आणि मल-मूत्राची योग्य विल्हेवाट लावल्यास देश स्वच्छ होईल, असे जोशी यांनी सांगितले. संचालन अतुल उपाध्याय यांनी केले. बीजोत्सव, कॅग, नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, निसर्गायनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘वेस्टर्न टॉयलेट’ दोषपूर्णदेशात ‘वेस्टर्न टॉयलेट’ बसविण्याचे अभियान जोरात सुरू आहे. त्यासाठी शासन अनुदान देत आहे. परंतु यामुळे घाणीची समस्या सुटणार नसून ती वाढणार आहे. या शौचालयात मलमूत्र, पाणी एकत्र होते आणि त्याचा कुठलाही वापर न झाल्यामुळे ते थेट जल स्रोतात मिसळते. त्यासाठी देशाच्या विविध भागात मलमूत्राच्या विल्हेवाटीच्या पद्धती पाहून त्या-त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या वापरल्यास भूजल, तलाव, नद्या प्रदूषित होणार नाहीत, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर