शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

मतमोजणी सकाळी ८ वाजतापासून : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 22:50 IST

लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल. मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन करुन आवश्यक सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी दिल्यात.

ठळक मुद्देकळमना मार्केटमध्ये चोख व्यवस्थामतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्थाप्रसार माध्यमांकरिता स्वतंत्र कक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या रामटेकनागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल. मतमोजणीसाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन करुन आवश्यक सर्व सुविधा निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी दिल्यात.छत्रपती सभागृहात लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रत्यक्ष मतमोजणीसाठी करावयाच्या व्यवस्थेचा आढावा नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात दोन स्वतंत्र हॉल तयार करण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार यांच्यासह विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्यक्ष मतमोजणीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी विधानसभा मतदारसंघनिहाय होणार असून यासाठी प्रत्येकी १४ टेबलवर ही मतमोजणी होईल. मतमोजणीच्यावेळी संपूर्ण व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून ५० व्हिडिओग्राफर यासाठी नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. मतमोजणी अत्यंत पारदर्शक व सुरळीतपणे पार पडण्याच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.बैठकीला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, उपजिल्हाधिकारी रवीद्रकुंभारे, अविनाश कातडे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भुयार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहसंचालक एस.आर. केकरे, लेखाधिकारी विनीत तिवारी आदी उपस्थित होते.केंद्रीय राखीव दलाच्या सुरक्षिततेखाली ईव्हीएममतदान झालेल्या ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये केंद्रीय राखीव दलाच्या सुरक्षिततेखाली ठेवण्यात आल्या आहेत. २३ मे रोजी सकाळी ६.३० वाजता विविध राजकीय पक्षाचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर उघडण्यात येतील. त्यानंतरमतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना प्रत्यक्ष मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.अधिकाºयांवर सोपविली जबाबदारीभारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना तयार करणे, व त्यानुसार टेबलची मांडणी, प्रसार माध्यम केंद्र, संवाद कक्ष, अग्निशमन व्यवस्था तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा आदी पायाभूत सुविधांची जबाबदारी कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे यांच्याकडे राहणार आहे.मनुष्यबळ व्यवस्थापनाची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांची असून तेथील सुरक्षा तसेच फेरीनिहाय मतमोजणी करण्याकरिता आवश्यक व्यवस्था जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे हे करणार आहेत.वाहन व्यवस्थेची जबाबदारी अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर, भोजन व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अन्न धान्य वितरण अधिकारी प्रशांत काळे तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सहसंचालक एस.आर.केकरे हे करणार आहेत.सिलिंग व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, मतदान यंत्राची वाहन व्यवस्था उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र भुयार आदी करणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक