शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदी वीस दिवसात पूर्ण होणार : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 00:31 IST

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे१५ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे असलेला कापूस राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १५ केंद्रांवर खरेदी करण्यात येत असून येत्या १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांकडील संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस पणन महासंघ व पीसीआयमार्फत कापसाची खरेदी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोविड-१९ नंतर ३९ हजार ३५२ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी ३ हजार ५०४ शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अद्याप २५ हजार ६४८ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. कापूस खरेदी करताना नोंदणीकृत शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले असून व्यापारी अथवा बाहेरुन येणाऱ्या राज्यातील कापूस खरेदी करण्यात येऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. रविवार वगळता इतर सुटीच्या दिवशी कापूस खरेदी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.कापूस खरेदीसाठी १५ जिनिंग व प्रेसिंग येथे व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ग्रेडर कृषी विभागामार्फत नियुक्त करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित कापूस खरेदीसाठी आणताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर