शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  दोन हजाराचे इन्फ्रारेड थर्मामीटर आठ हजारात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 23:44 IST

१९९९ रुपये एमआरपी किमत लिहिलेले हे थर्मामीटर तब्बल आठ हजारात विकले जात आहे. विशेष म्हणजे, याचे बिल दिले जात नाही. यामुळे याची तक्रारही होत नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे.

ठळक मुद्देमागणी वाढताच काळाबाजार सुरू : विक्रेत्यांमध्ये कारवाईची भीतीच नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या भीतीमुळे मास्कपासून, सॅनिटायझरची जोरात विक्री सुरू आहे. बहुसंख्य स्टॅर्ण्डड कंपन्यांच्या वस्तू बाजारातून गायब झाल्या आहेत, त्यांच्या जागी आता बोगस कंपन्यांच्या वस्तू आल्या आहेत. यांच्यावर कारवाई होत असली तरी ती व्यापक नाही. यामुळे याचा वचक बसत नसल्याने काळाबाजार बिनभोट सुरूच आहे. आता यात इन्फ्रारेड थर्मामीटरचाही समावेश झाला आहे. १९९९ रुपये एमआरपी किमत लिहिलेले हे थर्मामीटर तब्बल आठ हजारात विकले जात आहे. विशेष म्हणजे, याचे बिल दिले जात नाही. यामुळे याची तक्रारही होत नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे.कोरोना विषाणूबाबात प्रत्येक कार्यालय सतर्क झाले आहे. सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय केले जात आहे. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांना मास्क घालण्याची, सॅनिटायझर वापरण्याची किंवा वारंवार होत धुण्याची सूचना केली जात आहे. याची अंमलबजावणीही होताना दिसून येत आहे. आता याच्या एक पाऊल पुढे टाकत दुरूनच ताप मोजणाºया यंत्र ‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ची मागणी यांच्याकडून होऊ लागली आहे. सध्या हे यंत्र विमानतळावरील प्रवाशांच्यास तपासणीसाठी वापरले जात आहे. काही कार्यालयांकडून याच्या मागणीत वाढ होताच अनेक सर्जिकल स्टोअर्स व वैद्यकीय यंत्रसामग्री विक्रेत्यांकडे याचा स्टॉक संपलेला आहे. ज्यांच्याकडे आहे ते ‘एमआरपी’च्या कित्येकपट किमतीत विकत आहे.प्रस्तुत प्रतिनिधीने लिबर्टी टॉकीज चौकात असलेल्या एका दुकानात ‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ची मागणी केली असता, सुरुवातीला नसल्याचे सांगितले. परंतु थोड्याच वेळात आठ हजार रुपयांत असल्याचे माहिती देत यंत्र काढून दाखविले. यंत्राच्या डब्यावर एमआरपी किंमत १९९९ लिहिलेली होती. विक्रेत्याला याबाबत विचारले असता त्याने सांगितले, हे यंत्र चायनावरून येते. सध्या याचा पुरवठा नाही. हवे असेल तर घ्या. याचे बिल मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले.शहरातील बाजारात अनेक वस्तूंचा काळाबाजार सुरू आहे. लोक भीतीपोटी अव्वाच्या सव्वा किमतीत त्या वस्तू घेत आहेत. मात्र प्रशासन अद्यापही कठोर कारवाई करण्याच्या मन:स्थितीत नाही. यामुळे बिनबोभाट काळाबाजार सुरूच आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर