शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कोट्यवधीच्या जमिनीवर नगरसेवकाचा सिनेस्टाईल कब्जा करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 10:28 IST

रविवारी दुपारच्या सुमारास ३० ते ४० गुंडांनी हजारीपहाडमधील कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोध करणाऱ्या तेथील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली.

ठळक मुद्देसुरक्षा रक्षकाला मारहाण प्रचंड तोडफोड, धमकी अन् शिवीगाळ गिट्टीखदानमध्ये तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरसेवक कमलेश चाैधरी आणि त्यांच्या ३० ते ४० गुंडांनी हजारीपहाडमधील कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. विरोध करणाऱ्या तेथील सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. रविवारी दुपारी १२. ४० ते २. ३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

प्रकाश खुपचंद जैन (वय ७३, रा. धंतोली) हे व्यावसायिक आहेत. त्यांनी १९९० ला जैन यांनी गिट्टीखदानमधी हजारी पहाड भागात गेंदलाल खडगी आणि रामभाऊ खडगी यांच्याकडून जमीन विकत घेतली होती. पोलिसांकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, तेव्हापासून त्या जमिनीवर जैन यांचा ताबा आहे. त्यांनी लाखो रुपये खर्ची घालून सभोवताल वॉल कंपाउंड बांधले असून चारही बाजुला गेट लावले आहे. तेथे नेहमी सुरक्षा रक्षकही तैनात असतात.

गेल्या काही दिवसांपासून या जमिनीवर काही समाजकंटकांची नजर गेली आहे. जैन यांची ही जमीन हडपण्यासाठी काही भूमाफियांनी वेगवेगळी डावबाजीही केली आहे. मात्र, कागदपत्रे भक्कम असल्याने त्यांचा हा डाव वेळोवेळी उधळला गेल्याने काही समाजकंटक धमक्या देऊन ही जमीन हडपण्याच्या प्रयत्नात आहेत.

या पार्श्वभूमीवर, रविवारी १२.४० च्या सुमारास अभिजीत समर्थ नामक सुरक्षा रक्षकाने फोन करून जैन यांना माहिती दिली की आरोपी कमलेश चाैधरी (वय ३५), राहुल कानफाडे, दत्ता खोडे (वय ३४), बबलू ठाकूर (वय ३५), राजू माटे आणि सारिका चाैहान (रा. सर्व फ्रेण्डस कॉलनी, गिट्टीखदान) त्यांच्या ३० ते ४० साथीदारांसह येऊन तेथे दंगा करत आहेत. त्यांनी चारही बाजुच्या वॉल कंपाऊंडचे गेट तोडून जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न चालविल्याचेही समर्थने जैन यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी आपल्या काही नातेवाईक तसेच सहकाऱ्यांना तेथे पाठवून पोलिसांना फोन केला.

दरम्यान, धनंजय चोपडे याने आरोपींच्या गुंडगिरीची मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावर दंड्याने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. तोडफोड, आरडाओरड, शिवीगाळ अन् सिनेस्टाईल कब्जा मारण्याच्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दुपारी २. ३० पर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर गिट्टीखदान पोलीस तेथे पोहचले. त्यांनी जैन यांचे सुरक्षा रक्षक, कर्मचारी तसेच कब्जा करण्याचा प्रयत्न करणारे कमलेश चाैधरी आणि साथीदारांपैकी काहींना ठाण्यात नेले. तेथे वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

संतप्त प्रतिक्रियाअशा प्रकारे दिवसाढवळ्या कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जा मारण्याचा प्रयत्न होण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून पोलिसांचा गुंडांना धाक उरला नसल्याचे यातून स्पष्ट होते, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून ऊमटली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी