शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या तस्करीत अडकले नगरसेवकाचे नाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:00 IST

लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या प्रकरणात अडकलेले दोन आरोपी नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याचे कळल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दोन्ही बाईकस्वार युवकांना अटक केली आहे. त्यांनी ही दारू एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून ठेवल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पूर्व नागपुरातील नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकार्यकर्ते अटकेत : पोलिसांनी दोघांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीच्या प्रकरणात अडकलेले दोन आरोपी नगरसेवकाचे कार्यकर्ते असल्याचे कळल्यामुळे लकडगंज ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी दोन्ही बाईकस्वार युवकांना अटक केली आहे. त्यांनी ही दारू एका नगरसेवकाच्या सांगण्यावरून ठेवल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पूर्व नागपुरातील नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी सायंकाळी लकडगंज पोलिसांना जुना बगडगंजच्या प्लॉट क्रमांक ५२९ जवळ दारूचा साठा असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तेथे धाड टाकली. तेथे पोलिसांना देवानंद श्यामराव लाकडे (३६) आणि प्रशांत रमेश किरपाने (३०) हे दोघे सापडले. त्यांच्याकडून बाईकसह ४५ हजाराची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नागरिकांची गर्दी जमा झाली. नागरिकांनी ही दारू एका नगरसेवकाची असल्याचे सांगितले. त्यांनी नगरसेवकाच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. कारवाईची माहिती मिळताच नगरसेवकाचे समर्थक नेते तेथे पोहोचले. त्यांनी लकडगंज पोलिसांशी चर्चा केली. तासाभराच्या चर्चेनंतर नेत्यांना यश आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी नगरसेवकाला वाचविल्याची चर्चा पसरली. याबाबत ‘लोकमत’ने लकडगंज पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिकाऱ्यांचा दाखला देत माहिती देण्यास नकार दिला. पोलीस माहिती केंद्राने या बाबीची पुष्टी करत दोन आरोपींना अटक क रण्यात आल्याचे सांगितले. या कारवाईमुळे पूर्व नागपुरातील नेते आणि कार्यकर्त्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीSmugglingतस्करी