शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ईंग्रजी शाळांचा प्रस्ताव बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:29 IST

आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळा इंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती असल्याने हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.

ठळक मुद्दे बिकट आर्थिंक स्थितीचा परिणाम : आयुक्तांच्या अर्थसंकल्पात तरतूद असूनही निधी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळाइंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महापालिकेची बिकट आर्थिक स्थिती असल्याने हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता नसल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे.पटसंख्या वाढीला मदत२०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून सीबीएसई पॅटर्ननुसार सहा शाळा सुरू करण्यात येणार होत्या. मनपा सभागृहातही सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. याबाबतच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र कोविड-१९ मुळे ही प्रक्रिया ठप्प पडली.पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत असल्याने मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. इंग्रजी शाळा सुरू झाल्यास पटसंख्या वाढीला मदत होणार आहे.केंद्र सरकारच्या सहा शाळा मिळणारकेंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार महापालिकेला सहा शाळा मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची ग्वाही दिली आहे. पुढील वर्षात या शाळा सुरू होतील. यामुळे महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याला मदत होईल. अशी माहिती शिक्षण विशेष समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.पुढील सत्रात इंग्रजी शाळा सुरू करणारमनपाच्या सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रक्रीया सुरू करण्यात आली होती. निविदा काढल्या होत्या. मात्र कोविड-१९ चा वाढता संसर्ग लक्षात घेता डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होण्याची शक्यता नाही. जानेवारीपासून शाळा सुरू होतील. अशा परिस्थितीत इंग्रजी शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. त्या २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात सुरू होतील.प्रा. दिलीप दिवे, सभापती शिक्षण विशेष समिती, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्पenglishइंग्रजीSchoolशाळा