शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ६५ रुग्णवाहिका सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:36 IST

महापालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. बुधवारी पुन्हा २५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे आता रुग्णवाहिकांची संख्या ६५ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेत सध्या ४० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. बुधवारी पुन्हा २५ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू झाल्या. त्यामुळे आता रुग्णवाहिकांची संख्या ६५ झाली आहे. गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता जाणवत होती. महापौर व आयुक्त यांनी कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता शहरातील नागरिकांसाठी जास्तीच्या रुग्णवाहिका घेण्याचे निर्देश दिले होते. बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हिरवी झेंडी दाखवून रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत रुजू केल्या.अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बर्हीरवार, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक सी.एच.जमधाडे व संजय फेंडारकर, मनपा परिवहन विभागाचे रवींद्र पागे, अरुण पिपुरडे आदी उपस्थित होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार कोरोना बाधितांसाठी प्रत्येक झोनमध्ये चार रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटर आणि मनपा मुख्यालयात देखील रुग्णवाहिका उपलब्ध राहतील. गरजेनुसार कोरोना बाधितांसाठी झोन कार्यालयामध्ये फोन करून रुग्णवाहिका मागविता येईल. पूर्वी मनपाकडे २० रुग्णवाहिका होत्या मागच्या आठवड्यात त्यांची संख्या वाढवून ४० करण्यात आली.यात पुन्हा २५ अ‍ॅम्ब्युलन्सची भर पडली आहे. मनपा आयुक्तांनी रुग्णवाहिकेमध्ये पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर, वाहन चालकासाठी मास्क, हँड ग्लोव्ज (हात मोजे), सॅनिटायझर स्ट्रो ची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. ही रुग्णवाहिका नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध राहील.विनामूल्य मिळेल रुग्णवाहिकाकोविडचा प्रकोप वाढल्यामुळे रुग्णवाहिकेची कमतरता लक्षात घेता रुग्णांसाठी ६५ अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रुग्णवाहिका नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी संबंधितांनी झोन कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पिंटू झलके यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या